सांगोला – सांगोल्यातील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून रेवनील ब्लड बँक, सांगोला व कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान तसेच विद्यार्थिनींसाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ.आर.ए.देशमुख, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा.पी.जी.पवार उपस्थित होते. याप्रसंगी ५२ विद्यार्थ्यांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात योगदान दिले. तसेच ३१० विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ.आर.ए.देशमुख, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकमुनिकेशन विभागाचे विभागप्रमुख प्रा.आनंद गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली समन्वयक प्रा.अनिल बोरकडे, प्रा.ऋषिकेश गयाळी, प्रा.प्रगती पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

















