सध्या राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बरसत आहे. दरम्यान, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस सुरु आहे. अशातच धाराशीव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील एका गावात निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार पाहायला मिळाला आहे. तुळजापूर तालुक्यातील मसला येथे वीज पडल्याची घटना घडली आहे. ज्या ठिकाणी वीज पडली जागेतून निळ्या रंगाचे पाणी येत आहे. हा प्रकार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.
जमिनीतून निळ्या रंगाचं पाणी येत असल्यानं आश्चर्य
धाराशीव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मसला येथे वीज पडलेल्या जागेतून निळ्या रंगाचे पाणी येत असल्याचे दिसत आहे. सातत्यानं हे निळ्या रंगाचे पाणी येत आहे. हे निळ्या रंगाचे पाणी जमिनीतून येत असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, भुगर्भातुन हे निळ्या रंगाचे पाणी का येत आहे, याचा शोध प्रशासन घेत आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ काढ काढण्यासाठी लोकांनी गर्दी केल्याचे पाहयला मिळत आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून धाराशीव जिल्ह्यातील वादळी वाऱ्यांसह पावसाची हजेरी
मान्सून 6 जून रोजी महाराष्ट्रात दाखल झाला आहे. कोकणानंतर मुंबईत मान्सून दाखल झाला असून, आता राज्याच्या विविध भागात मान्सून हळूहळू सक्रिया होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून धाराशीव जिल्ह्यातील वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे.
अनेक भागात जोरदार पावसाचा इशारा
हवामान विभागानं आज अनेक भागात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. अनेक ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. पालघर, रायगड या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आलाय. तसेच, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांना आयएमडीने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच विदर्भातील बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिय, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे.