Wednesday, March 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

रामसखा बडवे यांना काण्ववेद पाठशाळेचा ब्रम्हभूषण पुरस्कार व पंकजदेव महाराज यांना काण्ववेद पुरस्कार अर्पण

Makrand Dhobalebyतरुण भारत
February 6, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – येथील काण्ववेद पाठशाळेकडून दिला जाणारा ब्रम्हभूषण पुरस्कार येथील रामसखा कृष्णाजी बडवे  यांना तर काण्ववेद पुरस्कार वाशिमचे ज्येष्ठ वैदिक, भागवताचार्य  पंकजजी देव महाराज यांना मंगळवारी (ता.३) प्रदान करण्यात आले.

काण्ववेद पाठशाळेचे अध्यक्ष ह.भ.प.शंकरमहाराज बडवे यांनी या कार्यक्रमातच पुरस्कार राशी पाच सहस्त्रावरुन अकरा सहस्त्र केल्याची घोषणा केली. 

काण्ववेदपाठशाळेचे प्रधानाचार्य वे.शा.सं.शंकरमहाराज गलगलकर यांनी शाळेच्या पंचवीस वर्षांहून अधिक काळांचा व यापूर्वीच्या वैदिक विद्वज्जनांच्या पुरस्कारांचा उहापोह केला. वेदप्रसारकार्य व शिक्षण कार्य पुढे ही चांगलेच चालू राहील असे अभिवचन दिले. शिक्षक शिकवायला तयार आहेत पण विद्यार्थी मिळत नाहीत ही खंतही व्यक्त केली.

याच कार्यक्रमात पंढरपूर नगरपरिषदेचे नवनिर्वाचित युवा नगरसेवक भागवत महाजन बडवे यांचा या निमित्ताने सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक बडवे यांनी काण्ववेद पाठशाळेस सर्व प्रकारचे सहाय्य करीत राहू असे आश्वासन दिले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव मुंडेवाडीकर यांनी केले. दोन्ही पुरस्कारार्थींचा अल्पपरिचय हिंदू महासभेचे नेते अभयसिंह कुलकर्णी इचगावकर यांनी करून दिला.

या काण्ववेदपाठशाळेच्या वर्धापन दिनानिमित्त अन्य काही धार्मिक कार्यक्रम भागवत महाजनबडवे आणी अभिराज बडवे यांचेकडून संपन्न झाले.  अतिशय पवित्र आणी मंगलमय वातावरणात मंदिर परिसरातील श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात  हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास पाठशाळेतील विद्यार्थ्यां समवेतच इतर नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————–

ब्रम्हभूषण पुरस्कार मिळालेले रामसखा बडवे यांचा परिचय
सावरकरांचे सहकारी, क्रांतिवीर वसंतदादा बडवे व त्यांचे सर्व बंधू राष्ट्रभक्तीने प्रेरित होते. ” हे काय बंधू असतो जरी सात आम्ही, त्वस्थंडिच असते दिधले बळी मी”अशा पध्दतीने हे सातबंधू देशसेवेसाठी क्रांती, सावरकर समादेशाप्रमाणे सैन्यसेवा व हिंदुमहासभा विचारांतून देशसेवा करीत होते. रामसखा यांनी षट्कर्मांचे यथास्थित पालन करून ब्राम्हतेज टिकविले. स्वतः वेदाध्ययन करुन नवीन युवकांना विनाअट निःशुल्क शिकविले. वेदविद्या ही पोटभरणेची विद्या नसून ते कर्तव्य आहे याचे भान राखले. अखिल हिन्दुत्वाच्या भावनेने अनेक बहुजन युवकांना मार्गदर्शन केले. अनेक ब्राह्मण युवकांना वेदाध्ययनाची गोडी लावून संहितेपर्यंत शिकविले. याच विद्यार्थ्यांनी त्यांचा हा बहुमान केला.
——————

काण्ववेद पुरस्कार मिळालेले पंकजजी देव परिचय
या कार्यक्रमातील मुख्य असा, “काण्ववेद पुरस्कार ” विदर्भातील वाशीम नगरीचे, बालाजी मंदिराचे अधिकारी, वैदिक वारकरी विद्वान, भागवताचार्य, पंकजजी देव महाराज यांना देण्यात आला. त्यांनी पंचवीस वर्षांहून अधिकवेळा वारीला आलो, आज पांडुरंग प्रसाद मिळाला तो पांडुरंगचरणी लीन आहे असे भावगर्भ ऊद्गार काढले. त्यांचे मार्गदर्शन व जटा क्रमसहित अल्प वेदपठनाने उपस्थित भारावून गेले व त्यांना काही सेवेसाठी पुन्हा पंढरीला या असे आवाहन केले.

Post Views: 23
Previous Post

अकलूजमध्ये अग्नितांडव : दोन चाकी, चार चाकिसह कोट्यावधी रुपयांचा माल जळून खाक 

Next Post

सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम

Makrand Dhobale

तरुण भारत

Next Post

सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम

ताज्या बातम्या

अर्धनारी नटेश्वराचा हळदी सोहळा भक्तिभावात संपन्न;  यात्रोत्सवाला दिमाखात प्रारंभ

अर्धनारी नटेश्वराचा हळदी सोहळा भक्तिभावात संपन्न;  यात्रोत्सवाला दिमाखात प्रारंभ

March 25, 2026
आयएमएस समर्थ, रॉयल्स या संघाची विजयी सलामी; इंडियन मॉडेल पॅरेंट्स क्रिकेट लीग – १६ स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

आयएमएस समर्थ, रॉयल्स या संघाची विजयी सलामी; इंडियन मॉडेल पॅरेंट्स क्रिकेट लीग – १६ स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

March 25, 2026
दिव्यांग शिबिरात तब्बल २०४ दिव्यांगांना मॉड्युलर हात आणि पाय मोफत बसविले

दिव्यांग शिबिरात तब्बल २०४ दिव्यांगांना मॉड्युलर हात आणि पाय मोफत बसविले

March 25, 2026
शिक्षक पात्रता परीक्षेबाबत शासन लवकरच पुनर्विचार याचिका दाखल करणार : राज्यमंत्री पंकज भोयर

शिक्षक पात्रता परीक्षेबाबत शासन लवकरच पुनर्विचार याचिका दाखल करणार : राज्यमंत्री पंकज भोयर

March 25, 2026
ग्रामपंचायतीकडून ५ टक्के दिव्यांग निधीचे वाटप; १८ लाभार्थ्यांना ११ हजारांचा निर्वाह भत्ता

ग्रामपंचायतीकडून ५ टक्के दिव्यांग निधीचे वाटप; १८ लाभार्थ्यांना ११ हजारांचा निर्वाह भत्ता

March 25, 2026
पिलीव येथील रक्तदान शिबीरात 163 जणांचे रक्तदान

पिलीव येथील रक्तदान शिबीरात 163 जणांचे रक्तदान

March 25, 2026
विद्यार्थ्यांनी अनुभवली जिवाची मुंबई, लहान वयात मोठं स्वप्न; मुंबई दर्शनातून ते विधानभवनापर्यंत

विद्यार्थ्यांनी अनुभवली जिवाची मुंबई, लहान वयात मोठं स्वप्न; मुंबई दर्शनातून ते विधानभवनापर्यंत

March 25, 2026
बांधकाम कामगार स्थानिक सल्लागार शासकीय समिती स्थापन; अध्यक्षपदी आमदार उत्तमराव जानकर

बांधकाम कामगार स्थानिक सल्लागार शासकीय समिती स्थापन; अध्यक्षपदी आमदार उत्तमराव जानकर

March 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0765305

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697