वेळापूर – वेळापूर पोलिसांनी परिसरामध्ये २१ लाख रुपये किंमतीचा गुटखा व मुद्देमाल ९ लाख रुपये अशी एकुण ३० लाख रुपयांचा मालमत्ताप कडून जप्त करून मोठी कामगिरी केली आहे.
८ जानेवारी २०२६ रोजी वेळापूर पोलीस स्टेशन हद्दीत रात्रीची गस्त घालणारे पोलीस नाईक नितीन लिंगडे पोशी बसवराज बिराजदार व पोहे अविनाश मोरे यांना घुमेरा वेळापूर येथे पहाटे ३:०० तिच्या सुमारास सांगोला ते अकलूज रोडवर अशोक लेलँड कंपनीचे चार चाकी वाहन mh 42 bf 28 87 या वाहनातील माला बाबत संशय वाटल्याने सदर वाहनाची चौकशी केली असता सदर वाहनात पाठीमागील हौद्यात बारदानाच्या पोत्यामध्ये अवैधरित्या प्रतिबंधित गुठखा असल्याचे दिसून आल्याने वाहन ताब्यात घेऊन ते वेळापूर पोलीस स्टेशन येथे आणून मंगेश लवटे अन्नसुरक्षा अधिकारी सोलापूर यांना कळवून त्यांच्या उपस्थितीत सदर वाहनातील गुठखा असलेल्या बारदानाची पोत्यांची पंचा समक्ष तपासून पाहता एकूण ६२ बारदानाच्या पोत्यामध्ये व ३ पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये विमल पान मसाला, आर एम डी, सुगंधी तंबाखू गुटखा असे एकूण २१ लाख ६७ हजार १२० रुपयाचा प्रतिबंधित गुटखा व ९ लाख रुपये किमतीचे अशोक लेलँड वाहन व वाहनाच्या केबिनमध्ये व २० हजार रुपये किमतीचे vivo कंपनीचे २ मोबाईल सह एकूण ३० लाख ८७ हजार १२० रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने मंगेश लवटे अन्नसुरक्षा अधिकारी सोलापूर यांनी जप्त
करून ताब्यात घेतले आहे. तसेच सदर वाहनाची तपासणी करता सदर वाहनामध्ये गुटखा असल्याचे कोणी ओळखू नये म्हणून वाहनाच्या पाठीमागे फाळका एक थर प्लास्टिक गोण्यामध्ये सोयाबीन भरले होते. सदर वाहनावर पोलीस कारवाई करत असताना वाहनाचा चालक हा वाहन जागीच सोडून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला आहे.
गुठखा प्रतिबंधित अन्नपदार्थाचा विक्रीसाठी वाहनातून घेऊन जात आढळून आले आहे व अन्नसुरक्षा आयुक्त महाराष्ट्र राज्य या लोकसेवकाने त्यांना दिलेल्या अधिकारा नुसार जनहित व जन आरोग्याच्या दृष्टिकोनातून काढलेल्या आदेशाची अवज्ञा केल्याने मिळून आलेल्या वाहनाचे अज्ञात चालक, अज्ञात मालाचे मालक याच्याविरुद्ध मंगेश मल्हारी लवटे अन्नसुरक्षा अधिकारी सोलापूर यांनी वेळापूर पोलीस स्टेशनला कलम 223, 274, 275, 123 सह अन्य सुरक्षा आणि मानके अधिनियम कलम 26(२),(i)(ii)(iv)२७(३)(e),३०(२)(a)५९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी भाऊसाहेब गोसावी व पोलीस उपनिरीक्षक आकाश शेळके, पोलीस हेड कॉन्स्टेबल यशवंत आनंदपुरे, लिंगडे नितीन, बसवराज बिराजदार, तानाजी पांढरे ,अविनाश मोरे यांनी केली आहे. याचा अधिक तपास सपोनी भाऊसाहेब गोसावी हे करीत आहेत.
























