वेळापूर – वेळापूर–अकलूज रस्ता अत्यंत खड्डेमय व जीर्ण झाल्याने तो कायमस्वरूपी दुरुस्त करावा, तसेच माळशिरस तालुक्यातील विविध प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) माळशिरस तालुक्याच्या वतीने अकलूज–वेळापूर मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
अकलूज येथील अशोका चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शिवामृत ते उदयनगर, निमगाव पाटी ते यशवंतनगर अकलूज, वेळापूर–धानोरे, वेळापूर–उघडेवाडी–माळखांबी–चव्हाणवाडी, तसेच मंजूर असूनही प्रलंबित असलेला वेळापूर–निमगाव म्हेत्रे मळा–पिसेवाडी रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
रिपाइं तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या सहभागातून लोकशाही मार्गाने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व वाहनचालकांना येणाऱ्या अडचणींबाबत एन. के. साळवे, सोमनाथ भोसले, किरण धाईंजे, बाळासाहेब धाईंजे, सरपंच रजनीश बनसोडे, विजय बनसोडे,रणजित सरवदे, गोपाळ घार्गे,स्वप्निल सरवदे आदींनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी प.महा. उपाध्यक्ष एन. के. साळवे, जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले, युवक राज्य उपाध्यक्ष किरण धाईंजे, प.महा. संघटक एस. एम. गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष शामराव भोसले, जिल्हा सचिव रमेश धाईंजे, माजी जि. प. सदस्य बाळासाहेब धाईंजे, सरपंच रजनीश बनसोडे यांच्यासह मार्केट कमिटीचे माजी संचालक दादाराजे घाडगे , संजयकाका देशपांडे, मारुती खांडेकर, गोपाळकाका घार्गे, आबा बनसोडे, बापूसो पोळके, भास्कर बनसोडे, दिलीप सरतापे, संतोष कांबळे, पोपट गेजगे, सुनील ओवाळ, दादासाहेब नामदास, शिवाजी बनसोडे,भागवत गायकवाड,अशोक बनसोडे,शरद साठे,विनायकराव माने, राजकुमार शिंदे,धनाजी धांडोरे,अजितदादा साठे,डॉ.धनंजय म्हेत्रे,राहुल सराटे,विनायक भगत,शिवाजी मोहिते, प्रदीप सरवदे,बॉबी वाघमारे,जहांगीर आतार, गौतम वाघंबरे,संतोष बनसोडे,शरद साबळे,राहुल गायकवाड,मिलिंद गायकवाड, महेश साठे, महेंद्र धांडोरे, वैभव बनसोडे,लखन साळवे, ऋतिक लोंढे, गणपत कदम, राहुल सातपुते, मनोज सुरवसे, दिलीप वाघमारे, प्रवीण साठे, दीपक भोसले, महादेव नाईकनवरे, गोपी भगत, चंद्रकांत चंदनशिव, राजू नाईक आदी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता ए. डी. पवार यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. कार्यकारी अभियंता सुनीता पाटील कार्यालयीन कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांनी दूरध्वनीद्वारे दोन दिवसांत बैठक घेण्याचे आश्वासन दिले.
आंदोलनाची तातडीने दखल घेऊन रस्त्यांच्या कामास सुरुवात करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अन्यथा पुढील टप्प्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकून हालगीनाद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आंदोलक मिलिंद सरतापे यांनी दिला.

















