अक्कलकोट : सोमवार दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी भारताचे थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त श्री एस जी परमशेट्टी हायस्कूलमध्ये राष्ट्रीय गणित दिन उत्साहात संपन्न .सदर कार्यक्रम शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. एम. एस. स्वामी सर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख अतिथी म्हणून दुधनीतील गणित शिक्षक श्री शांतेश धोडमनी सर ,प्राथमिक कन्नड शाळेचे शिक्षक श्री गणपती पवार सर ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री महेश कुंभार ,पर्यवेक्षक श्री एल एस गद्दी सर व अन्य शाळेतील शिक्षक वर्ग यांच्या उपस्थित पार पडला .
सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचे महत्व पटवून देणारे भाषण , गणितीय समूहगीत , गणित कोडे, गणित शायरी असे विविध कार्यक्रम घेण्यात आले यामध्ये उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला .
या कार्यक्रमात प्रास्ताविक भाषण श्री अविनाश भैरुणगी सर आणि श्री गणपती पवार सर , श्री धोडमनी सर , चंद्रशेखर खंडाळ सर यांचे मनोगत झाले व शेवटी श्री स्वामी सर अध्यक्षीय भाषण केले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कुमारी साक्षी सिन्नूर व कुमारी लक्ष्मी जंबगी यांनी केले तर आभार प्रदर्शन कुमार आशिष येगदी यांनी केले .
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे गणित विभाग प्रमुख श्री सिद्धाराम नुला सर व गणित शिक्षक श्री चंद्रशेखर खंडाळ सर, श्री अविनाश भैरुणगी सर, सौ श्रृती दिवटे मॅडम, सौ महादेवी कोरे मॅडम व शाळेतील अन्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

















