जाफराबाद प्रतिनिधी
दिनांक:- २६\०६\२०२४ येथील सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश देशमुख हे होते तर उपप्राचार्य प्रोफेसर डॉ. सुनील मेढे आणि आणि उपप्राचार्य प्रा. विनोद हिवराळे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रमुख वक्ते म्हणून प्रा. निर्मला खांडेभराड यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले.
प्रमुख वक्ते यांनी आपल्या भाषणात छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना सामाजिक, आर्थिक, कृषी विषयक, शैक्षणिक तसेच क्रीडा विषयक कार्यावर सखोल प्रकाश टाकला. छत्रपती शाहू महाराजांची शिक्षणाविषयीची तळमळ व जागृती याविषयी विवेचन करताना प्रा. खांडेभराड म्हणाले की समाजातील वंचित उपेक्षित घटकांनी शिक्षण घेतले पाहिजे व त्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी सक्तीचे शिक्षण केले जे पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठविणार नाहीत त्यांना एक रुपया दंड ठोठाविण्यात आला. २४ जून१९१७ पासून कोल्हापूर संस्थानात शिक्षण हे सक्तीचे व मोफत देण्यास सुरुवात केली.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. देशमुख यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजवटीचा माणूस हा केंद्रबिंदू असल्याचे वेगवेगळ्या कार्याच्या आधारे विवेचन केले. तसेच छत्रपती शाहू महाराजांनी सदृढ समाज निर्मितीसाठी व्यायामशाळा, कुस्ती आखाडे, मल्लखांब तसेच रंकाळा तलावाची निर्मिती केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनंदा सोनुने यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. संजय पाटील यांनी मांडले कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.