Friday, July 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा; मुंबई, कोल्‍हापूर, पुणे, लातूरला विजेतेपद

तरुण भारतbyतरुण भारत
May 18, 2026
in editor
0
छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा; मुंबई, कोल्‍हापूर, पुणे, लातूरला विजेतेपद
0
SHARES
27
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बदलापूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, कुळगाव-बदलापूर नगरपरिषद यांच्या संयुक्त्त विद्यमाने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुंबई, कोल्‍हापर, पुणे, लातूर विभागाने विजेतेपद पटकावले. रात्री अडीच वाजेपर्यंत रंगलेल्‍या राज्‍य व्हॉलीबॉल स्पर्धेचा महासंग्राम पहाण्यासाठी बदलापूरकरांचा उदंड प्रतिसाद पहाण्यास मिळाला.

बदलापूर जिमखाना मैदानावर संपलेल्‍या राज्य व्हॉलीबॉल स्‍पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ आमदार किसन कथोरे व कुळगाव-बदलापूर नगरपरिषदच्‍या नगराध्यक्षा श्रीमती रूचिता घोरपडे यांच्‍या हस्‍ते झाला. याप्रसंगी मुख्यधिकारी मारूती गायकवाड, नगरसेवक किरण भोईर, माजी नगराध्यक्षा राजेंद्र घोरपडे, सभापती शैलेश वडनरे, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, मुंबई विभागाचे उपसंचालक नवनाथ फरताडे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुवर्णा बारटक्के आदी मान्‍यवर उपस्‍थित होते.

विद्युत प्रकाशझोतात रंगलेल्‍या स्‍पर्धेत १८ वर्षांखालील मुलांच्‍या गटात कोल्‍हापूरच्‍या संघ बाजीगर ठरला. २३-२५, २७-२५,२१-२५, २५-२० व १५-१२ गुणांनी नागपूरचा पराभव करीत मैदान गाजवले. पहिला सेट गमविल्‍यानंतर कोल्‍हापूरने दुसऱ्या व चौथ्या सेटला मुसंडी मारली. पाचव्‍या निर्णायक सेटमध्ये वैभव ढगेने अफलातून फटका मारून सामन्‍याचे पारडे फिरवले. उत्‍कर्ष पाटील, संजोग पाटील व जुनेद शेख यांनी वेगवान खेळ करीत कोल्‍हापूरचे नाव विजेतेपदाच्‍या चषकावर कोरले. संघाचे आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक अजीत पाटील यांनी विजेतेपदाचे शिखर गाठण्यासाठी केलेले मार्गदर्शन लक्षवेधी ठरले.

२१ वर्षांखालील मुलींच्‍या गटात पराभवानंतर सलग ३ सेट जिंकून मुंबईने नाशिकचा लोळवून विजेतेपदावर नाव कोरले. १६-२५, २५-१८,२५-१९, २५-२१ गुणांनी मुंबई अजिंक्‍य ठरला. शिवप्रिया पनीकर, दिव्‍या मेहता व वेदिका सामगिर या खेळाडुंनी दुसऱ्या सेटमध्ये पिछाडीवर असलेल्‍या संघाला एकहाती सेट जिंकून दिला. गतविजेता नाशिक विभागाला चौथ्या सेटमध्ये रोखून मुंबईच्‍या संघाने विजेतेपदाला गवसणी घातली.

मुलींच्‍या १८ वर्षांखालील गटात पुणे विरूध्द नागपुर आमनासामना एकतर्फी झाला. अनुभवी खेळाडूंच्‍या भरणा असलेल्‍या पुणे विभागाने नागपूरचा २५-१९,२५-१८, २५-१६ गुणांनी विजेतेपद पटकावले. साक्षी साळुंखे, वैष्णवी अडलिंगे व श्रेया चव्‍हाणने आक्रमण करीत पुणे संघाला विजयश्री बहाल केली. २१ वर्षांखालील मुलींच्‍या गटात पुणे संघाने नागपूरवरच मात करीत तिसरे स्‍थान संपादन केले.

रात्री अडीच वाजेपर्यंत रंगलेल्‍या २१ वर्षांखालील मुलांच्‍या गटातील विजेतेपदाची लढत लातूरने जिंकली. चार सेटपर्यंत रंगलेल्‍या लढतीत लातूरने २५-१६,१५-२५, २५-२१,२५-१९ गुणांनी मुंबईचा पराभव केला. निर्भय देशमुख, शेहराज खान, आफताब कुरेशी या खेळाडूंनी आक्रमक झुंज देत तिसऱ्यांदा विजेतेपदाला गवसणी घातली. दुसरा सेट गमविल्‍यानंतर पुन्‍हा आघाडी घेत लातूरने बाजी मारत उपस्‍थित प्रेक्षकांची मने जिंकली.

पाच दिवस चाललेल्‍या या स्‍पर्धेत राज्‍यतील ८ विभागातील ३८४ खेळाडूंचा थरार रंगला. स्‍पर्धेत कोल्‍हापूर, लातूर, अमरावती, संभाजीनगर, पुणे, नागपूर, मुंबई व नाशिक या संघात चुरशीच्‍या लढती पहाण्यास मिळाल्‍या. १८ व २१ वर्षांखालील युवकांचा व्‍हॉलीबॉलचा थरार प्रथमच बदलापूरकरांनी अनुभवला. स्‍पर्धेतील विजेत्‍यांवे २३ लाख ३५ हजारांची रोख बक्षिसे व करंडक, पदकांनी कौतुक करण्यात आले.


रात्री अडीचवाजेपर्यंत बदलापूरकरांचा उदंड प्रतिसाद
बदलापूर नगरी रंगलेला व्‍हॉलीबॉलचा रणसंग्राम पहाण्यासाठी बदलापूर जिमखाना मैदानावर सोमवारी रात्री अडीच वाजेपर्यंत प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. रविवारी संध्याकाळी ६ वाजल्‍यापासूनच मैदान गर्दीने फुलून गेले होते. सोमवारी रात्री अडीच वाजेपर्यंत लातूर विरूध्द मुंबईची झुंज पहाण्यासाठी गॅलरी हाऊसफुल होती. आबालवृध्दांसह तरूणांनी राज्‍य व्‍हॉलीबॉलचा रंगलेल्‍या थरार याची देही याची डोळा अनुभवला. चित्तथरारक उत्‍कंठापूर्ण लढतीची पर्वणी प्रथमच बदलापूरकरांनी अनुभवली. क्रीडाप्रेमी नगरसेवक किरण भोईर यांनी थेट प्रेक्षक गॅलरीत जाऊन समालोचन करूनही स्‍पर्धा स्‍मरणीय केली.

Post Views: 179
Previous Post

अभिनेत्री प्राजक्ता माळीचा कान्समध्ये मराठमोळा अंदाज #viral #maharashtranews

Next Post

पश्चिम रेल्वेच ‘आरबीआय व्यावसायिक खो-खो स्पर्धेचे’ विजेते

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
पश्चिम रेल्वेच ‘आरबीआय व्यावसायिक खो-खो स्पर्धेचे’ विजेते

पश्चिम रेल्वेच ‘आरबीआय व्यावसायिक खो-खो स्पर्धेचे’ विजेते

ताज्या बातम्या

शंभर वर्षाचा ऐतिहासिक रस्ता पुन्हा खुला करावा 

शंभर वर्षाचा ऐतिहासिक रस्ता पुन्हा खुला करावा 

July 2, 2026
डॉक्टरांच्या निस्वार्थ सेवेला अभिवादन;  एमआयटी व्हीजीएस शाळेचा प्रेरणादायी उपक्रम

डॉक्टरांच्या निस्वार्थ सेवेला अभिवादन;  एमआयटी व्हीजीएस शाळेचा प्रेरणादायी उपक्रम

July 2, 2026

पंढरपूरच्या कवठेकर प्रशालेवर ‘आदर्श शाळा’ पुरस्काराची मोहोर गुणवत्तेचा गौरव 

July 2, 2026
लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटी आणि विणकरबाग प्रभात मंडळ वतीने डॉक्टर, शेतकरी, चार्टर्ड अकाउंट दिन साजरा

लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटी आणि विणकरबाग प्रभात मंडळ वतीने डॉक्टर, शेतकरी, चार्टर्ड अकाउंट दिन साजरा

July 2, 2026

ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांनी मानधन सन्मान योजनेंतर्गत ३१ जुलै पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत

July 2, 2026
हरित वारी उपक्रमांतर्गत एक लाखांहून अधिक सीडबॉल निर्मिती;  पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

हरित वारी उपक्रमांतर्गत एक लाखांहून अधिक सीडबॉल निर्मिती;  पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

July 2, 2026

मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश

July 2, 2026
यंदाच्या वर्षी श्री शेगांव गजानन महाराज पालखी शनिवार रोजी कुचन हायस्कूल येथे मुक्कामी

यंदाच्या वर्षी श्री शेगांव गजानन महाराज पालखी शनिवार रोजी कुचन हायस्कूल येथे मुक्कामी

July 2, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0954846

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!