सांगोला – तहसिल कार्यालय, सांगोला अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर शुक्रवार दि.१० एप्रिल रोजी शिवणे येथील मुक्ताई मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले होते.
या शिबीरास तहसीलदार बाळुताई भागवत, गट विकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी, स्मिता गोडसे, मोहन आलदर, बाळासाहेब काटकर, दादासाहेब घाडगे तसेच मंडल अधिकारी, मंडल कृषी अधिकारी, ग्राम महसुल अधिकारी, ग्राम पंचायत अधिकारी, कृषी सहाय्यक व शिवणे मंडलामधील लाभार्थी उपस्थित होते.
सदर शिबीरामध्ये ७२ फेरफार निकाली काढणेत आले. ७/१२ दुरुस्ती संदर्भात १ अर्ज स्विकारण्यात आला. १०२ डिजिटल ७/१२, ३५ ८ अ उतारे, ७५ प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आले. तसेच तालुका कृषि अधिकारी या विभागाअंतर्गत मंजुर शेती अवजारे व ट्रॅक्टर यांचे मंजुरीचे ५ प्रमाणपत्र व ग्राम विकास विभागाकडुन मंजुर घरकुलाचे आदेश वितरित करण्यात आले.
























