तभा फ्लॅश न्यूज/वाशी : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेली जलयुक्त शिवार ही योजना शेतकऱ्यांसाठी जीवनदायी योजनात ठरत आहे. या योजनेमुळं शेतकरी सुजलाम सुफलाम झाला असून वर्षानुवर्ष कोरड्या फट पडलेल्या विहिरी पाण्याने डबडबत आहेत. कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जाणारा मराठवाडा कमी पाऊस नापिकी, कर्जबाजारीपणामुळं शेतकरी आत्महत्या थांबत नव्हत्या राज्यात केंद्रात २०१४ साली भाजपचं सरकार आलं आणि देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले.
फडणवीस यांनी ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर अवघ्या काहीच दिवसांतच त्यांना राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यातली त्यात मराठवाड्यामध्ये भयान दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती. दुष्काळात पशुधनाचं मोठं नुकसान झालं. जनावरांना चारा मिळत नव्हत, विहीर, बोर, तलाव कोरडे फट पडले होते. शेती उद्योग पार मोडकळीस आला होता. पाण्याअभावी बागायती पीक जळून गेली, बँकांकडून घेतलेलं कर्ज कसे फेडायचं शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता. शेतकरी सर्वत्र हतबल झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी पाहणी दौरा सुरू करून ताबडतोब राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाला नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात आणि त्यातली त्यात मराठवाडा हा कायमचा दुष्काळमुक्त झाला पाहिजे त्यासाठी मोठी योजना आखण्याचे नियोजन केले.
ती योजना म्हणजे २०१९ पर्यंत महाराष्ट्राला दुष्काळमुक्त राज्यासाठी महाराष्ट्र सरकारनं “जलयुक्त शिवार अभियान” हा प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन आखले. जलयुक्त शिवार योजना हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाकांक्षी जलसंधारण आणि जलव्यवस्थापनाचा प्रकल्प आहे. याची सुरूवात २०१५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झाली. राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळमुक्त करणे आणि जमिनीतील जलसाठा वाढविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश होता. या योजनेच्या माध्यमातून जमिनीवर पडलेल्या पावसाचं पाणी वाया न जाता जमिनीत मुरवणे, पाझर तलावांचे पुनरुज्जीवन, नाल्यांचे खोलीकरण, नाला बांधणी, शेततळ्यातील गाळ काढणे, बांध भरणी, सिमेंट बंधारे बांधणं आणि जलस्त्रोतांचे पुनर्भरण करण्यासाठी वॉटरशेड व्यवस्थापनांतर्गत हे प्रकल्प राबवविले त्याचबरोबर यासाठी स्थानिक शेतकरी, स्वयंसेवी संस्था आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सहकार्याने ही योजना राबवविली.
पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करण्याच्या दृष्टिने शेतकऱ्यांना शेतात शेततळी बांधण्यासाठी अनुदान दिले. त्यानंतर मे महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि दरवर्षी वाहून जाणारं पाणी राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामात अडवले गेले. त्यामुळे विहीर, बोरच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. सर्वत्र शेतकऱ्यांनी ऊस, केळी, द्राक्ष, आंबा यासारख्या बागायती पिकांची लागवड केल्यानं दुष्काळामध्ये मोडकळीस आलेला शेती उद्योग पुन्हा एकदा जोमाने सुरू झाला आणि शेतकऱ्याचं आर्थिक गणित जुळलं गेलं त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही योजना जीवनदायीने ठरत आहे असेच म्हणावे लागेल. २०१९ पर्यंत जलयुक्त शिवार हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात जोमाने राबवविला गेला.
२०१९ च्या निवडणुकानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील या सरकारने देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झालेल्या कामांची चौकशी करण्याचे आदेश देत या योजनेला स्थिगिती दिली. १४ ऑक्टोबर २०२० रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलयुक्त शिवार अंतर्गत झालेल्या कामांची खुली चौकशी करण्याचा आणि ही योजना स्थगित करण्याचा निर्णय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने घेतला. जून २०२२ मध्ये महाविकास आघाडी सरकार जाऊन पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले. देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १३ डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात जलयुक्त शिवार २.० अभियान सुरू करण्यास मान्यता दिली. तसेच येणाऱ्या ३ वर्षात या योजनेंतर्गत ५ हजार गावांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला.
देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर जलयुक्त शिवार या योजनेची जल ट्रेन सुसाट धावत आहे. मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात जलयुक्त शिवार ही योजना मोठ्या प्रमाणात राबवण्यात आली. गावागावातील नदी, नाले, ओढे, तलाव गाळणी व्यापले होते. त्यामुळे पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाचं पाणी न अडवलजा थेट मोठ्या नद्यांना वाहून जात असे, त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होत नसल्याने जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात पाण्याच्या झळा तालुक्यातील शेतकऱ्यांना, नागरिकांना सोसाव्या लागत होत्या.
मे महिन्यात तर मोठ्या अडचणींवर मात करावी लागत. शासनाकडून याची दखल घेत तालुक्यातील गावागावात जलयुक्त शिवार योजना राबविली गेली. त्यामुळे वाहून जाणारे पाणी या योजनेच्या माध्यमातून अडवलं गेलं असल्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली. बंद पडलेले बोर विहिरी आता या योजनेमुळे पाण्यानी डब-डबत आहेत.
पुरेसा पाणी साठी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी ऊस, केळी, द्राक्ष यासारख्या बागायती पिकांची लागवड केली. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही योजना जीवनदायी ठरत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या पुढच्या पिढ्यांना दुष्काळ पाहू देणार नाही, या संकल्पाने सुरू केलेल्या या लोकचळवळीचा आता वटवृक्ष होत आहे.