आ. श्यामसुंदर शिंदे यांच्या प्रयत्नामुळे विष्णुपुरी प्रकल्पातील 12 पंप व उद्धरण नलिकेसाठी 160 कोटी 64 लाखाच्या निधीस मान्यता
लोहा
कै.शंकरराव चव्हाण विष्णुपुरी सिंचन प्रकल्पातील 12 विद्युत पंप व उद्धरण नलिकाची अत्यंत बिकट अवस्था झाल्याने लोहा व कंधार तालुक्यातील हजारो शेतकरी सिंचनापासून वंचित राहत होते, याबाबत लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आ. श्यामसुंदर शिंदे यांनी मार्च 2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी माडुन कामाला मंजुरी मिळवून घेतली.
लोहा तालुक्यातील 15 हजार 927 हेक्टर व कंधार तालुक्यातील 2100 हेक्टर शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळवून देण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे आवाज उठवला होता
कै. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचे 12 विद्युत पंप व उद्धरण नलिका तात्काळ बदलून नवीन विद्युत पंप व उद्धरणनलिका बसविण्याची मागणी केली होती त्या दुरुस्तीसाठी 125 कोटीचा निधी तात्काळ मंजूर केला.
जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासनाच्या 29 जुलै 2024 च्या शासन निर्णयाद्वारे विष्णुपुरी प्रकल्पातील 12 विद्युत पंप व उद्धरण नलिकेसाठी विशेष दुरुस्ती अंतर्गत 160 कोटी 64 लाख 57 हजार 223 रुपये निधी कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे सांगीतले.