सोलापूर : नूतन महापौर विनायक कोंड्याल यांनी आमदार देवेन्द्र कोठे यांच्या देव-यज्ञ ( संवाद जनतेशी) या ठिकाणी सदिच्छा भेट दिली.
नूतन महापौर विनायक कोंड्याल यांनी यानिमित्ताने सोलापूर मध्यचे आ. देवेन्द्र कोठे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान आमदार कोठे यांनी नूतन महापौर विनायक कोंड्याल यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासंदर्भात विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
शहरातील नागरी समस्या, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच विकासकामांना गती देण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी महापौरांनी दिली. याप्रसंगी नगरसेवक मेघनाथ येमूल, प्रशांत पल्ली, गुरुशांत धुत्तरगावकर, वासुदेव इपलपल्ली, नागेश खरात,बोजराज माने आदी उपस्थित होते.























