सोलापूर- दमणी नगर येथील रेल्वे पूल पाडण्यासाठी पहिल्या दिवसाठी तयारी सुरू करण्यात आली. दिल्लीतील ठेकेदारास याची जबाबदारी देण्यात आली आहे. यासाठी 200 टन क्षमता असलेले तीन क्रेन 15 हून अधिक कटर, 15 जेसीबी सह शंभरहून अधिक कर्मचारी व अधिकारी तैनात करण्यात येणार आहे. पूल पडकामासाठी बारा तासांचा कालावधी घेतला असून, कमीत कमी वेळेत पूल पाडण्याचे नियोजन असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले.
पुलास तीन ते पाच फुटाच्या अंतरावर कंटेनर कट करण्यात येणार आहे. यामध्ये जेवढे शक्य आहे त्या पद्धतीने पूलाच्या वरील बाजूने मलबा उचलण्यात येणार आहे. जो मलबा खाली पडणार आहे तो जेसीबी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने तातडीने हटण्याचे नियोजन आहे. जे लोखंडी गर्डर आहेत ते क्रेनच्या बाजूने उचलून बाजूला करण्यात येणार आहे. सर्वात कठीण काम लोखंडी गर्डर सुरक्षित पद्धतीने काढण्याचे आहे. त्यासाठी यात सर्वाधिक वेळ जाणार आहे. दिल्लीचा ठेकेदार असून त्यांना पुलाचे पाडकाम करण्याचा दहा वर्षाचा अनुभव असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले.
पूलाचे पाडकाम करताना पुलाखाली रेल्वे रूळ व सिग्नल यंत्रणेस कोणतीही बाधा पोचणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. पुलाचा मलबा पडू नये यासाठी पुलाखाली फ्लाय ओवर उभारण्यात येणार आहे. जो मलबा रूळावर पडण्याऐवजी तो त्या फ्लाय ओवरवर पडेल शिवाय रेल्वे सेवा सुरू राहण्यासाठी सिग्नल यंत्रणा सर्वात महत्त्वाची असल्याने त्याचीही काळजी घेतली जाणार आहे. पूलाखाली असलेले रेल्वेचे उच्च दाब केबल वायरिंग त्याच दिवशी तात्पुरत्या स्वरूपात काढण्यात येणार असल्याचे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले.
प्रत्येक तीन तासांचा प्लॅन तयार
रेल्वे व राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्यात नऊ महिन्यांपासून पूल पाडकाम करण्याचे नियोजन सुरू आहे यामध्ये पोलपाडकाम करताना येणाऱ्या अडचणी रेल्वे सेवेवर व शहरातील वाहतुकीवर होणारा परिणाम याचे नियोजन करण्यात आले आहे कमी रेल्वे गाड्या बाधित होतील यानुसार नियोजन करण्यात आले आहे पूल पाडकामासाठी सकाळी आठ वाजता सुरुवात होणार आहे.
























