सोलापूर : १९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव साजरा करण्याकरिता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये असलेल्या पुतळा नूतनीकरणाची अर्धवट कामे त्वरित पूर्ण करून देण्यात यावीत. डाळिंबी आड, इंदिरा कन्या प्रशाला लगत शिंदे चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व चौकामधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा परिसरामधील सर्व कामे त्वरित मार्गी लावावीत अशा मागणीचे निवेदन श्री शिवजन्मोसो मध्यवर्ती महामंडळ ट्रस्टच्या वतीने नूतन महापौर विनायक कोंड्याल यांना देण्यात आले आहे.
यावेळी ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे, उत्सव अध्यक्ष जयवंत सलगर , कार्याध्यक्ष उत्तरा बचुटे — बरडे, उपाध्यक्ष किरण भंडारी ब्रह्मदेव पवार, मिरवणूक प्रमुख विजय पूकाळे, ट्रस्टी सदस्य प्रकाश ननवरे ,सचिव प्रीतम परदेशी ,देविदास घुले, राजू काकडे, सुभाष पवार ,नागेश वडणे, सतीश महाले, अथर्व शिंदे प्रसिद्धीप्रमुख दीपक शेळके, कृष्णकांत चव्हाण आदी उपस्थित होते
डाळिंब आड येथे मनपाकडून सालाबादप्रमाणे मैदानाची साफसफाई करून मिळावी ,मंडप टाकने, रोलिंग करणे, मलमा टाकने , मरंगरंगोटी करणे, लाइटिंग करणे, कुस्तीचा आखाडा तयार करून देणे, प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी तयार करणे या कामाची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
डाळिंब आड येथील मूर्तीस व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील अश्वरूढ पुतळ्यास सकाळ संध्याकाळ पूजेची व्यवस्था करण्यात यावी. शिवमंदिराची लायटिंग व परिसरातील स्वच्छता आदी कामे त्वरित करून देण्यात यावीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुड पुतळ्यासमोर स्टेज तयार करणे, त्यावर मॅटिंग तसेच महिलांना बसण्यासाठी मॅटिंग टाकने, चबुतरा व पुतळ्या नजीक फुलांची सजावट करणे, पाळणा कार्यक्रमासाठी लाइटिंग, ध्वनिक्षेपक सत्कार करीता स्टेज, स्क्रीन लावणे, छायाचित्रकाराकरिता स्टेज, सत्कार करिता स्टेज स्पीकर लाईट मंडप मेघडंबरी चौकाच्या तिन्हीही बाजूस टावर उभे करून फोकसची व्यवस्था करणे, 18 फेब्रुवारी रोजी पाळणा कार्यक्रमास महिलांना येणे सुलभ व्हावे यासाठी शहरातील सुचवलेल्या मार्गावरून बसेस सोडण्याची व्यवस्था करावी. मिरवणूक पाहण्याकरिता आलेल्य नागरिकांना बसण्यासाठी गॅलरीची व्यवस्था करण्यात यावी. आधी मागण्या या निवेदनाद्वारे महापौरांकडे करण्यात आल्या आहेत
मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे महापौरांचे आदेश
महामंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनातील विविध मागण्यांवर तातडीने महापालिकेच्या संबंधित विभागाने कार्यवाही करावी असे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साही वातावरणात आवश्यकता सोयी सुविधांसह सुरळीत पार पाडण्यासाठी सूचना दिल्या, अशी माहिती महापौर विनायक कोंड्याल यांनी दिली.























