तभा फ्लॅश न्यूज/लोहा :घरकुल आवास योजना बिलांचे वितरण न होणे आणि शहरात मूलभूत सुविधांचा अभाव या मुद्यांवर काँग्रेस पक्षाच्या वतीने जुना लोहा येथून नगरपालिकेवर मोर्चा धडकला काँग्रेसचे लोहा-कंधार विधानसभा प्रभारी एकनाथ मोरे, माजी शिक्षण सभापती संजय कन्हाळे, माजी जि. प. सदस्य श्रीनिवास मोरे, संजय भोसीकर, तालुकाध्यक्ष मधुकर दिघे, माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार, वसंत पवार, गणेश घोरबांड, शिवाजी आंबेकर, सरपंच बाबासाहेब बाबर आदीची उपस्थित होते.
मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांना निवेदन सादर करण्यात आले. प्रलंबित घरकुल आवास योजनेचे बिलांचे वितरण करावे, शपाणीपुरवठा, गटारे, रस्ते, स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात यासाठी धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विक्रांत नळगे, गजानन कळसकर, अमोल महामुने, सत्तार शेख, राजेश ताटे, छत्रपती कदम, कृष्णा दाभाडे, विनोद लोढा, लक्ष्मण गायकवाड, विनोद पांचाळ, पुरभा सावळे, संभाजी सावळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.