Wednesday, July 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अक्कलकोट बंदची हाक! संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हल्ल्यावर संताप, १८ जुलैला आंदोलन

बहुजनांचा बंदसाठी पुढाकार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 17, 2025
in solapur, top news
0
अक्कलकोट बंदची हाक! संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हल्ल्यावर संताप, १८ जुलैला आंदोलन
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
तभा फ्लॅश न्यूज/ अक्कलकोट : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये झालेला जीवघेणा हल्ला हा पुरोगामी विचारांवर झालेला प्रतिगामी हल्ला असून, बहुजन समाज आणि सकल मराठा समाज हा हल्ला कदापिही खपवून घेणार नाही. या घटनेच्या निषेधार्थ येत्या शुक्रवारी, १८ जुलै रोजी अक्कलकोट बंदची हाक देण्यात आली असून हा बंद दुपारी २ वाजेपर्यंत कडकडीत राहणार आहे. या बंदमध्ये सोलापूर जिल्हा तसेच शहरातील बहुजन चळवळीतील सर्व संघटना आणि नेते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिली.
गेल्या रविवारी अक्कलकोट येथे प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेकून व अंगावर वंगण टाकून भ्याड हल्ला करण्यात आला.
 या प्रकाराचा निषेध करण्यासाठी बुधवारी श्री फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या सभागृहात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी माऊली पवार बोलत होते. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, हा केवळ एका व्यक्तीवरचा नव्हे तर संपूर्ण पुरोगामी चळवळीवरचा हल्ला आहे. या हल्ल्याची नोंद संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावी, अशा पद्धतीने अक्कलकोट बंदचे नियोजन करण्यात येत आहे.
या बैठकीस सोलापूरमधील मराठा समाजाचे नेते पुरुषोत्तम बरडे, नाना काळे, राजन जाधव, राम गायकवाड यांच्यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बंदमध्ये शाळा, महाविद्यालये, दुकाने व अन्य व्यवहार बंद राहणार असून, केवळ दवाखाने आणि मेडिकलसारख्या अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात येणार आहेत. बाहेरून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये आणि स्थानिक जनतेला अडचण होऊ नये म्हणून बंद फक्त दुपारी २ वाजेपर्यंत असला तरी तो पूर्णतः कडकडीत असेल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना मराठा सेवा संघाचे राम गायकवाड म्हणाले, मुळात हा कार्यक्रम फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाज यांच्यावतीने आयोजित करण्यात आला असताना काहीजण विनाकारण अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले आणि अमोलराजे भोसले यांची बदनामी करत आहेत. हे एक नियोजित षडयंत्र असून, आम्ही हे सहन करणार नाही. या षडयंत्रामागे नेमके कोण आहे, हे शोधून काढले जाईल. बाबा निंबाळकर यांनीही या प्रकरणात नाहक भोसले कुटुंबीयांची बदनामी केली जात असल्याचा ठपका ठेवत या कारस्थाना विरुद्ध निश्चित आवाज उठवला जाईल. हा बंद फक्त गायकवाड यांच्यावरच्या हल्ल्याचा नव्हे, तर या बदनामीचा निषेध म्हणूनही आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सकल मराठा समाज बहुजन चळवळ आणि श्री फत्तेसिंह शिक्षण संस्था यांच्यावतीने या बंदचे आयोजन करण्यात आले आहे.या बंदला काही जणांनी तात्काळ पाठिंबा दर्शवला आहे.  सर्वांनी पाठिंबा घोषित करावा,असे आवाहन फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या संचालक बाळासाहेब मोरे यांनी केले.
दरम्यान या अक्कलकोट बंदला सर्व स्तरातून जाहीर पाठिंबा मिळत असून काँग्रेस नेते अशपाक बळोरगी, मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी एजाज मुतवल्ली आणि शाकीर पटेल यांनी पाठिंबा दर्शविला आहे. यावेळी अरुण जाधव, अतुल जाधव, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मल्लिनाथ साखरे, अ‍ॅड. सुरेशचंद्र सूर्यवंशी, मनोज निकम, अमर शिंदे, अभय खोबरे, शाम मोरे, लाला राठोड, दयानंद काजळे, तम्मा शेळके, प्रवीण घाडगे, शितल फुटाणे, वसंत देडे, वरूण शेळके, प्रवीण देशमुख, प्रसन्न हत्ते यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बदनामीचे षडयंत्र योद्धा शरण जात नाही  म्हटल्यावर बदनामी केली जाते अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी आपली भावना व्यक्त केली. जेव्हा एखादा लढवय्या झुकत नाही, तेव्हा त्याला बदनाम करण्याचे डाव रचले जातात. आज जनमेजयराजे भोसले आणि अमोलराजे भोसले यांच्यावर अशाच प्रकारचे षडयंत्र सुरू आहे. मात्र या प्रकरणाची खरी माहिती प्रवीण गायकवाड यांना देण्यात आलेली आहे त्यावर पडदा देखील पडलेला आहे,अशी माहिती यावेळी देण्यात आली.
ज्या चौकात हल्ला केला,
त्याच चौकात सन्मान करू !
गायकवाड यांच्यावर ज्या चौकात हल्ला
झाला, त्याच चौकात त्यांचा भव्य नागरी सत्कार करून विचारांचा विजय साजरा केला जाईल, असेही माऊली पवार यांनी ठामपणे जाहीर केले. विचारांची लढाई ही विचारांनीच लढली पाहिजे, असा संदेश देत त्यांनी हा हल्ला संपूर्ण बहुजन चळवळीवर आहे, असे सांगत एकतेचा निर्धार व्यक्त केला.
Post Views: 48
Tags: solapur tarun bharatsolapur tarun bharat solpaur tarun bharatsolpaur tarun bharatsolpaur tarunbharattarun bharattarun bharat marathitarun bharat solapur
Previous Post

घरकुल आवास बिल व नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे आंदोलन

Next Post

सिंचनाच्या दिशेने वाटचाल! पिंपळढव व रेणापूर प्रकल्प प्रगतीपथावर : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सिंचनाच्या दिशेने वाटचाल! पिंपळढव व रेणापूर प्रकल्प प्रगतीपथावर : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सिंचनाच्या दिशेने वाटचाल! पिंपळढव व रेणापूर प्रकल्प प्रगतीपथावर : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

ताज्या बातम्या

‘देऊळबंद’ चित्रपट संकल्पनेचे यश सुवर्ण अक्षरांनी कोरले जाईल – महेश इंगळे

July 14, 2026
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – अनंत विभूषित जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी

सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – अनंत विभूषित जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी

July 14, 2026

वारीतील मायमाऊलींसाठी ‘हिरकणी’चा दिलासा; १७० कक्षांत विश्रांती, आरोग्य व सुरक्षिततेच्या सुविधा

July 14, 2026
सिव्हिल चौक परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाई; २ अनधिकृत खोके केले निष्काशित

सिव्हिल चौक परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाई; २ अनधिकृत खोके केले निष्काशित

July 14, 2026
अवैध दारूसाठा जप्त; सपोनी योगेश लंगुटे यांची धडाकेबाज कारवाई. 

अवैध दारूसाठा जप्त; सपोनी योगेश लंगुटे यांची धडाकेबाज कारवाई. 

July 14, 2026

पालखी मार्गाची झेडपी अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांकडून संयुक्त पाहणी

July 14, 2026
महाराष्ट्र शासनाच्या नव्या निर्णयाने बांधकाम कामगारांच्या कल्याण योजनांमध्ये मोठे बदल; संघटनांचा तीव्र विरोध

महाराष्ट्र शासनाच्या नव्या निर्णयाने बांधकाम कामगारांच्या कल्याण योजनांमध्ये मोठे बदल; संघटनांचा तीव्र विरोध

July 14, 2026
शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर; महाराष्ट्राला 7  खेळांच्या यजमानपदाचा बहुमान

शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर; महाराष्ट्राला 7 खेळांच्या यजमानपदाचा बहुमान

July 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0976670

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!