सांगोला – सांगोला महाविद्यालयात दि.२६ नोव्हेंबर रोजी राज्यशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, रिमेंम्बरन्स-डे समिती व अंतर्गत गुणवत हमी कक्षा यांच्या वतीने संविधान दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांनी संविधान दिनाचे महत्त्व विशद केले. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन डॉ.जमीर तांबोळी यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे नियोजन कार्यालयीन अधिक्षक विलास माने यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे डॉ.रेणुकाचार्य खानापूरे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.रामचंद्र पवार, शारीरिक शिक्षण संचालक प्रा.जगदीश चेडे, प्रा.डॉ.तानाजी माने यांनी केले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















