सोलापूर : संविधान बचाव समितीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मुस्लिम, भटके विमुक्त, बौद्ध, धनगर यांच्यासह बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हर घर संविधान होईल, देश महान यासह विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला.संविधान धोक्यात असून संरक्षण करण्याचा खंबीर निर्धार मान्यवरांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.
संविधानाचा अंमल सुरू होऊन 75 वर्षाचा कालावधी लोटला आहे. संविधानामुळेच विविध जाती धर्माचे आणि विविध भाषा बोलणारे लोक एकत्र नांदत आहेत. संविधानामुळेच भारत अखंड आणि एकात्म राहिला आहे. सर्वांना स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय प्रदान केला जात आहे असे असतानाही भारतीय संविधानाला संपविण्याचे कट कारस्थान रचले जात आहे. त्यामुळे देशाचे संविधान वाचवावे या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. बुधवारी दुपारी संविधान समर्थकांच्या या महामोर्चास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरुवात करण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय पुनम गेट येथे या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या मोर्चामध्ये बहुजन समाजातील संविधान समर्थक सर्व घटकांचा सहभाग होता.
बोधगया महाबोधी विहार बौध्दांच्या ताब्यात द्यावे.
संकटात सापडलेला शेतकरी, शेतमजूरांच्या समस्या सोडवा त्यांना मदत करा.मुस्लिमांच्या वक्फ बोर्डावर फक्त मुस्लिम व्यक्तीची नियुक्ती करावी. आरक्षण अ ब क ड वर्गीकरण करु नये. समाजात फूट पाडू नये, क्रिमिलेयरची अट घालू नये. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालवी. सरसंघचालक मोहन भागवत यांना सरकारने दिलेली सुरक्षा काढून घ्यावी.
अंधश्रध्दा पसरविणारी शिक्षण पध्दती बंद करुन विज्ञानवादी शिक्षणपध्दती राबवावी. आदिवासी, धार्मिक अल्पसंख्यांकाना संविधानाने दिलेले आरक्षण कायम ठेवावे.जातीनिहाय जनगणना करुन जातीच्या संख्येप्रमाणे आरक्षण लागू करावे. मागसवर्गीयांचा निधी इतरत्र वळवू नये. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करावी. संविधानाप्रमाणे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय दिला पाहिजे यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी मान्यवरांचे भाषणे झाली.संविधान धोक्यात असून संरक्षण करण्याचा खंबीर निर्धार सर्वांनी व्यक्त केला.
या आंदोलनात माजी आ. नरसय्या आडम, निमंत्रक सुभानजी बनसोडे, कामगार नेते अशोक जानराव, जनार्दन शिंदे, अण्णासाहेब भालशंकर, राजाभाऊ सोनकांबळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माझी महापौर सुशीला आबुटे, अलका राठोड, गौतम मसलखांब, अतिश बनसोडे, फारुक शेख, रॉकी बंगाळे, मिलिंद प्रक्षाळे, विजयानंद भालशंकर, युवराज पवार, कुणाल बाबरे, सचिदानंद व्हटकर , अशोक आगावणे, धर्मेद्र चंदनशिवे, सुमित्रा जाधव, प्रा. संघमित्रा चौधरी, संध्या काळे, सुचित्रा थोरे, अशोक लामतुरे, प्रमिला तुपलवंडे, मयूर तळभंडारे , युवराज पवार, शौकत पठाण, प्रा. सिद्धार्थ जाधव, बाली मंडेपु , विष्णू कारमपुरी, आयाज दिना, रेश्मा मुल्ला, यशवंत फडतरे, सागर उबाळे, एड. केशव इंगळे, महंमद शाहरुख पिरजादे , दत्तात्रय सिद्धगणेश, सुनिता गायकवाड यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा, माकपा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड, समता सैनिक दल, अखिल भारतीय सफाई काँग्रेस, प्रहार संघटना, विविध पक्ष सामाजिक संघटना संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



















