सोलापूर – शालेय जीवनात स्नेहसंमेलनाला विशेष महत्व आहे. या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे जतन होणे काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी आई , वडील, गुरूजन, गाव देशाचे नावलौकीक करण्यासाठी प्रयत्न करावे. स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांचे कलागुण व्यक्त करण्यासाठी उत्तम व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन माजी आमदार व संस्थेचे अध्यक्ष शिवशरण पाटील यांनी केले. ते मंद्रूप येथील लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
यावेळी संस्थेचे सचिव तथा माजी सभापती गुरूसिध्द म्हेत्रे, सरपंच अनिता कोरे, संस्थेचे सहसचिव आप्पासाहेब म्हेत्रे, संस्थेचे उपाध्यक्ष महादेव शिळ्ळे, प्राचार्य बसवराज कुमठेकर, पर्यवेक्षक मदगोंडा मलकारी, बाळू देशमुख, माळी समाजाचे अध्यक्ष सिद्धेश्वर हेळकर, सुरेश पाटील, अमोगसिद्ध पुजारी, वाघेश म्हेत्रे, रविशंकर म्हेत्रे, सुरेखा पुजारी, पत्रकार अमोगसिद्ध मुंजे, श्रीधर टेळे ,श्रीधर लोभे आदी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधन करणारे विविध नाटके, कोळी नृत्य, संभाजी वध, राजमाता जिजाऊ, ठसकेबाज लावणी, लेझीम नृत्य, अनेक हिंदी सिने गीतावर समूह नृत्य असे बहारदार कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतीश जकुणे, ज्योती जोडमोटे, राणी अडवीतोटे, सोमशंकर म्हेत्रे, सुभाष सुतार, धानप्पा बगले, विद्यानंद हिरेमठ, शिवपुत्र म्हेत्रे,रमेश व्हनमाने, प्रा. नरेश पवार, प्रा. सूर्यकांत विभुते आदींनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी, पालक, गावकरी, शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























