अक्कलकोट – दै तरुण भारतने प्रकाशित केलेली दिनदर्शिका आगळी वेगळी आहे .सण वार धार्मिक उत्सव जयंती पुण्यातिथी संस्कृती दिन विशेष आवश्यक माहितीसह ज्ञानात भर घालणारी आहे असे प्रतिपादन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे मुख्य कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी केले .
दै सोलापुर तरुण भारत च्या वतीने दिनदर्शिकेचे प्रकाशन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे मुख्य कार्यकारी विश्वस्त अमोलराजे जन्मेजयराजे भोसले , सचिव शामराव मोरे ‘ दै .तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत माने . ‘ दै . सोलापुर तरुण भारत मराठवाडा आवृत्ती प्रमुख राजाराम मस्के ‘ स्वामी समर्थअन्नछत्र मंडळ न्यासाचे पुरोहित विश्वभंर पुजारी , आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती .
यावेळी दैनिक सोलापुर तरुण भारतचे अक्कलकोट प्रतिनिधी नंदकुमार जगदाळे , पत्रकार स्वामीराव गायकवाड ‘ पत्रकार राजेश जगताप , पत्रकार रमेश भंडारी ,, एस.के.स्वामी, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, शिवू स्वामी, अनिल बिराजदार, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.


















