Wednesday, March 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

रामोशी बेरड समाज महायुती सोबत दौलत शितोळे

तरुण भारतbyतरुण भारत
January 20, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माळशिरस – नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने इतिहास घडवला आहे. हा इतिहास घडवणारे व्यक्ती म्हणजे होणारे पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस होत अठरापगड जाती एकत्र आल्या आणि सर्व समाज एकत्र आला आणि न भूतो न भविष्यती असा निकाल दिला आहे. आता बारा जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. आणि सगळ्यात जास्त रामोशी बेडर समाज या बारा जिल्ह्यांमध्ये जास्त आहे. तन-मन-धनाने आम्ही तुमच्याबरोबर आहोत छत्रपती शिवाजी महाराजांसोबत बहिर्जी नाईक होते त्या पद्धतीने रामोशी समाज आपला बॉडीगार्ड म्हणून राहील ताकतीने आपल्या पाठीमागे उभा आहे असे मत जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांनी माजी आमदार राम सातपुते यांच्या श्रीराम बंगला निवासस्थानी रामोशी बेडर  समाज बांधवांच्या उपस्थितीत बोलताना व्यक्त केले.

यावेळी माजी आमदार राम सातपुते यांनी दौलत नाना शितोळे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला.

पुढे बोलताना शितोळे म्हणाले प्रत्येक ठिकाणी आपण काही ना काही मागणी केली. ज्या ज्या ठिकाणी कॅपॅबल मंडळी आहेत, त्या  ठिकाणच्या आमदारांपर्यंत आपल्या मागण्या पोहोचवल्या. जिल्हा परिषद व पंचायत समितीला मागण्या केल्या. काही ठिकाणी शब्द दिला तर काही ठिकाणी घोषणा झाल्या. काल बावनकुळे साहेबांचा फोन आल्यानंतर आज मी या ठिकाणी आलो आहे. ज्या मला अपेक्षा होत्या त्या अपेक्षांपेक्षाही जास्त काम रामभाऊंनी केलं आहे. सातपुते यांनी समाजाला भरभरून दिलं आहे.  त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील समाज भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे. पण या तालुक्यातील खरा रामोशी बेडर समाज ज्याच्या अंगामध्ये खऱ्या अर्थाने रामोशीच रक्त आहे, हा रामोशी समाज एकही टक्का, एकही मतदान बाजूला जाणार नाही, असा शब्द मी देतो. एवढी कठोर भूमिका मी मांडली आहे, त्या पाठीमागचं कारण म्हणजे, रामोशी बेडर समाज स्वतंत्र काळामध्ये अनेक वर्षांपासून आद्य क्रांतिवीर झाले नव्हते, ते आज झालेत. ते आदरणीय देवाभाऊंनी क्रांतिवीर घोषित केले आणि त्यांची सरकारी जयंती घोषित केली.

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकावर आज सहा वर्ष झाले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस येतात, मानवंदना देतात. रामोशी समाजाच्या 20 मागण्या त्या ठिकाणी पूर्ण झाल्या. आज राष्ट्रीय स्मारका करता पाच एकर शंभर कोटींची जमीन जमीन असून त्या ठिकाणी 50 कोटी रुपये टाकले आहेत. आणि त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक होऊन अख्या रामोशी बेडर समाजाचा इतिहास होतोय. आमच्या रामोशी समाजामध्ये आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक असतील, बहिर्जी नाईक असतील असे अनेक महापुरुषांनी या भारताकरता पहिल्या तोंडावरती जसे मिलिटरीमध्ये बुरखा बटालियन असतं तसा रामोशी समाज हा लढायांमध्ये पुढे असायचा. इमानदार समाज म्हणून हा मानला जायचा. या समाजाला पूर्णपणे गाडलं होतं. त्या समाजाच्या महापुरुषांचं एकाही सरकारी टपरीला त्या ठिकाणी नाव नव्हतं. पाच आयटी कॉलेजला राजे उमाजी नाईक यांचे नाव लागलं, बहिर्जी नाईक यांचे नाव लागलं, बेडर कनप्पा यांचं लागलं. खूप मोठं काम यांनी केलं आहे.

आमची गोरगरीब जनता जी रोज दुसऱ्याच्या बांधावर जाऊन काम करते, त्यांच्याकरिता राजे उमाजी नाईक यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ उभा केले. त्याकरिता 50 कोटी दिले. आता पाचशे कोटींची तरतूद त्याकरता होत आहे. खऱ्या अर्थाने एवढा मोठा इतिहास आहे. रामोशी समाजाला एका पटलावरती आणण्याकरता एकच व्यक्ती त्या ठिकाणी कारणीभूत आहे ती म्हणजे भारतीय जनता पार्टीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्या देवाभाऊंच्या करता रामोशी समाजाला जे काही करावे लागेल त्या देवाभाऊंच्या कमळाकरता रामोशी बेडर समाज इथून पुढच्या काळात करणार. मी एवढाच शब्द देतो की, तन-मन-धनाने आम्ही तुमच्याबरोबर आहोत. पण बॉडीगार्ड म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसोबत बहिर्जी नाईक होते, त्या पद्धतीने रामोशी समाज आपला बॉडीगार्ड बनवून राहील. आणि ताकतीने आपल्या पाठीमागे उभा राहील.

माळशिरस तालुक्यात अनेक मोठमोठी व्यक्ती आहेत, अनेक गावगुंड तुमच्या वरती टपून आहेत. पण मी आपल्याला या ठिकाणी एकच सांगतो की, आपला इतिहास आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बहिर्जी नाईकांना विचारल्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज किल्ल्याच्या खाली येत नव्हते. आणि आज आपल्याला एवढीच विनंती आहे की रामोशी समाजाला आपण जो न्याय मिळवून दिला आहे आपल्याला विचारल्याशिवाय रामोशी समाज पुढे जाणार नाही. आणि संपूर्ण ताकतीने आपल्या पाठीमागे राहील. हा शब्द मी आपल्याला देतो. परत काही सभा लागतील नाही लागतील मला जमेल नाही जमेल, पण त्यामध्ये उमाजी असतील समाजाची अपेक्षा पूर्ण झालेली आहे. वेळ कमी आहे त्यामुळे आपण ज्यांना ज्यांना सपोर्ट केला आहे, त्यांच्या पाठीमागे आपण जाणार आहे. आमचं भागले आणि आता आम्ही जाणार नाही त्या पद्धतीने आम्ही करणार नाही. आणखीन जोमाने काम करु आणि जास्तीत जास्त मतदान कसे मिळेल या करीता समाजाने प्रयत्न करावा.

याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष अंकुशराव जाधव सर, युवक अध्यक्ष सुधीरजी दादा नाईक, तसेच अग्निनाथ बापू चव्हाण, उमाजी भाऊ बोडरे, काकासाहेब जाधव, अजितजी शिरतोडे, पप्पू बुधावले, पंकज बोडरे, सोमनाथ मदने, बारामतीचे नवनिर्वाचित नगरसेवक किरण खोमणे, सतीश चव्हाण, तुकाराम नाना चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, बापूराव नाना शिरतडे, बाळासाहेब अण्णा मदने, सागर जाधव, दत्ताभाऊ चव्हाण यांसह महायुती घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

Post Views: 33
Previous Post

दक्षिणमध्ये ४६८ अर्जांची विक्री; भाजपा ५, शिवसेना १ तर काॅंग्रेसकडून १ उमेदवारी दाखल

Next Post

प्रजासत्ताक दिन समारंभ नियोजन पुर्व बैठक संपन्न, तहसिलदार सचिन लंगुटे यांनी घेतला नियोजनाचा आढावा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

प्रजासत्ताक दिन समारंभ नियोजन पुर्व बैठक संपन्न, तहसिलदार सचिन लंगुटे यांनी घेतला नियोजनाचा आढावा

ताज्या बातम्या

रंगात रंगला श्री मल्हारी मार्तंड!, पर्यावरणपूरक रंगांनी रंगली जेजुरगडावरील रंगपंचमी

रंगात रंगला श्री मल्हारी मार्तंड!, पर्यावरणपूरक रंगांनी रंगली जेजुरगडावरील रंगपंचमी

March 11, 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक ‘कॉल’ युद्ध थांबवण्यासाठी पुरेसा! 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक ‘कॉल’ युद्ध थांबवण्यासाठी पुरेसा! 

March 11, 2026
बागलवस्ती वस्ती शाळेत महिला दिनानिमित्त ‘स्टॉप कॅन्सर’ कार्यशाळा

बागलवस्ती वस्ती शाळेत महिला दिनानिमित्त ‘स्टॉप कॅन्सर’ कार्यशाळा

March 11, 2026
सुबोध कांबळे यांना पीएचडी प्राप्त झाल्याबद्दल डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते सन्मान

सुबोध कांबळे यांना पीएचडी प्राप्त झाल्याबद्दल डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते सन्मान

March 11, 2026
महिला पोलीसांच्या कर्तृत्वाला सलाम,  पोलीस स्टेशनमध्ये महिला दिन उत्साहात साजरा

महिला पोलीसांच्या कर्तृत्वाला सलाम,  पोलीस स्टेशनमध्ये महिला दिन उत्साहात साजरा

March 11, 2026
लोकविकास विद्यालयात महिला सक्षमीकरण सप्ताह संपन्न

लोकविकास विद्यालयात महिला सक्षमीकरण सप्ताह संपन्न

March 11, 2026
तुकाराम भवन येथील गाळे  विस्थापितांना द्यावेत, कराराची पूर्तता करावी

तुकाराम भवन येथील गाळे  विस्थापितांना द्यावेत, कराराची पूर्तता करावी

March 11, 2026
महिला सक्षमीकरण सप्ताह उत्साहात; विविध उपक्रमांतून महिलांचा गौरव

महिला सक्षमीकरण सप्ताह उत्साहात; विविध उपक्रमांतून महिलांचा गौरव

March 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0724289

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697