सोलापूर : सोलापूर ते उळेवाडी असे दुचाकीवरून जाताना रविवार पेठेतील जोशी गल्ली येथे फिट येऊन पडलेल्या उळे येथील तरुणाचा मृत्यू झाला. हा प्रकार शुक्रवारी रात्री 8.15 च्या सुमारास घडला.
विजयकुमार लक्ष्मण लोहार (वय 38 , रा. उळे ता उत्तर सोलापूर) असे तरुणाचे नाव आहे. विजयकुमार हे शुक्रवारी सोलापुर येथे कामानिमित्त आले होते. काम संपूवन ते रात्री 8.15 च्या सुमारास भुलाभाई चौक येथून उळे गावाच्या दिशेने दुचाकीवर निघाले होते. दरम्यान जोशी गल्ली परिसरात त्यांना अचानक फिट आल्याने ते खाली पडले. यामुळे त्यांची शुध्द हरपल्याने त्यांना हवालदार रुपनर यांनी बेशुध्दावस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच तो मृत पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याची नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे.



















