देगलूर/प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसापासुन प्रलंबीत असलेल्या देगलूरच्या जुन्या बसस्थानकाला एक डोपडीचे स्वरुप आले असुन अनेक वर्षांपासून कोणतेच लोकप्रतिनिधीं लक्ष देत नसुन याचा नाहक त्रास सहण करणाऱ्या देगलुरकरांचे जाहीर आभार मानत कार्यकर्त्याने निवेदन दिले.
अनेक वर्षापासून देगलुरच्या जुन्या बसस्थानकाला नविन बांधकाम करावे अतिक्रमण काढण्याची माेहीम हाती घ्यावे, नवीन २५ बसेसची मागणी, ईलेक्ट्रिक बसेसचा समावेश, नवीन चार्जींग स्टेशन, लांबपल्याच्या रातराणी बससेवा, प्रत्येक बस हि शहराच्या मध्यवर्ती बसस्थानकाला भेट देऊनच जावे ई.वेळोवेळा तक्रारी देऊन सुध्दा फक्त गुत्तेदार बदला जातो मात्र प्रत्याक्षात कामाला मात्र सुरवात होत नाही हि देगलुरकरांसाठी खुप मोठी शौकांतीका आहे. त्यासाठी अजुन एकदा प्रशाशनाचे डोळे उघडण्यासाठी धनाजी जोशी यांनी निवेदनाद्वारे देगलूरच्या जुन्या बसस्थानकाचे बांधकाम करण्यासाठी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
























