भोकरदन : भोकरदन-हसनाबाद रस्त्यावरील निमंगाव फाट्याजवळ दुचाकी-ट्रकचा अपघातात एक ठार झाला आहे. हा अपघात सकाळी आठ वाजता घडला आहे
शिवराम शामराव इंगळे (वय ६० रा.भारज ता.जाफराबाद) ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे
जाफराबाद तालुक्यातील भारज येथील शिवराम इंगळे हे आपल्या पत्नीस संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होते.
भारज येथून भोकरदनला येऊन बसस्थानकात पत्नी, मुलगा आणि मुलीस छत्रपती संभाजीनगर या बसमध्ये बसून दिले. यानंतर शिवराम इंगळे हे भोकरदन-हसनाबाद मार्गे छत्रपती संभाजीनगर येथे दुचाकीवर जात असताना निंमगाव फाट्यावर हसनाबाद येथून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक (एमएच ४८ वाय ६१३५)ने दुचाकीला (एमएच २१ बीआर २९४०) समोरुन जोरदार धडाक दिली.
यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघाताची माहिती मिळतात निमंगाव येथील सरपंच संदीप सहाने यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यांना भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉ.सुमित सावंत यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पार्थिवदेहाचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. जाफराबाद तालुक्यातील भारज येथे दुपारी दोन वाजता त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. सदर घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल बोर्डे यांनी जाऊन पंचनामा केला आहे.
पत्नीला संभाजीनगर येथे दवाखान्यात घेऊन जात
शिवराम इंगळे यांची पत्नी गेल्या काही महिन्यापासून बीपी शुगर आधी आजाराने परेशान असल्याने उपचारासाठी संभाजीनगर येथे घेऊन चालले होते. भोकरदन येथे एसटी महामंडळाच्या बस मध्ये पत्नी मुलगा आणि मुलीस बसून देऊन दुचाकीवरून भोकरदन-हसनाबाद मार्गे संभाजीनगर येथे जात होते. यानंतर पत्नी आणि मुलास अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर रस्त्याच्या अर्ध्यामधून
भोकरदन येथे आले. पत्नीची तब्येत पुन्हा अचानक खराब झाल्याने भोकरदन येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. यानंतर ग्रामीण रुग्णालय परिसरात मुला मुलीचा आक्रोश पाहून परिसरातील लोकांच्या डोळ्यात पाणी आले होते.