अक्कलकोट – भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ता दयानंद बिडवे हे शांत, संयमी व मितभाषी अजात शत्रू असलेले कार्यकर्ते आहेत. गेल्या ३५ वर्षापासून भाजपात काम करत असले तरी त्यांनी पक्षाच्या हितासाठीच काम केलेले आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी कधी काम केलेले नाही. म्हणून त्यांना स्वीकृत नगरसेवक पदी निवड करण्याची मागणी सर्वस्थरातून होत आहे.
भारतीय जनता पक्षाचे हाडाचे कार्यकर्ते दयानंद बिडवे यांना स्वीकृत नगरसेवक पदी निवड करण्याबाबत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मल्लिनाथ साखरे, सुवर्णकार संघटना अध्यक्ष अनिल वेदपाठक,शिवसमर्थ संघटना सह शहरातील प्रतिष्टीत नागरिकांनी आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्याकडे साकडे घातले आहे.























