अक्कलकोट – तालुक्यातील मौजे किरनळळी गावात प्रधानमंत्री आदर्श गाव योजना ही सन २०२१-२२ मध्ये मंजूर झाली होती. यातील आराखड्याप्रमाणे किरनळळी गावात सर्व कामे ग्रामपंचायत मार्फत करण्यात आल्याची माहिती किरनळळी गावच्या सरपंच संगीता भंडारे यांनी दिली. अक्कलकोट तालुक्यातील किरनळी गाव हे सोलापूर जिल्ह्यातील मराठवाड्याच्या सीमेवर आहे.
किरनळळी गावच्या सरपंच पदाची धुरा संगीता भंडारे यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी गावच्या विकासाचा ध्यास घेतला आहे. सरपंच संगीता भंडारे यांनी किरनळी गावात विविध विकास कामे करत ग्रामस्थांना सुविधा दिल्या आहेत. गावांमध्ये मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमीमध्ये पाणी पुरवठ्याची सोय, मिरगे प्लॉटमध्ये कॉंक्रिटीकरण, अंगणवाडी वॉल कंपाऊंड चे बांधकाम, अड्डीकट्ट्याजवळ काँक्रिटीकरण रस्ता करणे, आवश्यक ठिकाणी हायमास्ट दिवे बसविणे आदी कामे करण्यात आल्याची माहिती सरपंच संगीता भंडारे यांनी दिली. शासनाच्या विविध योजनांमुळे किरनळळी गावातील घराघरात लाईट , पाणी , शौचालय ही व्यवस्था करण्यात आली आहे. सरपंच संगीता भंडारे यांच्या विकासाच्या दृष्टीमुळे आज किरनळी गावचे रुपडे बदलले आहे.
विकास कामांमुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे .किरनळी गावच्या विकासासाठी ग्रामस्थांसह ग्रामपंचायत सदस्य यांचे सहकार्य लाभल्याची माहिती सरपंच संगीता भंडारे यांनी दिली. या कामास ग्रामसेवक शिवपुत्र ढोपरे ,ग्रामपंचायत सदस्य पद्माकर भंडारे , राम भंडारे ,तंटामुक्त समिती अध्यक्ष हुसेनबाशा सुभेदार , माजी सरपंच अरुण भंडारे , सुभाष भंडारे , राजेंद्र कणमुसे , साहेबलाल सुभेदार , शंकर गुमते , सिद्धेश्वर सोनकांबळे , मल्लिनाथ उणदे , चंद्रकांत सोनकांबळे ,शंकर उणदे ,डॉक्टर शिवाजी गायकवाड ,प्राध्यापक कैलास भांगे, प्राध्यापक कमलाकर सोनकांबळे आदींचे सहकार्य लाभले आहे.


























