वाळूज महानगर (प्रतिनिधी) : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी करत निकाल आपल्या बाजूने खेचून आणला त्यामुळे वाळूज येथील भाजपा जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करा असे विठ्ठलाला साकडे घालून महाआरती करण्यात आली.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा महिला मोर्चा प्रभारी ज्योती गायकवाड ,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष जयमाला वाघ, युवा महिला मोर्चा अध्यक्ष वैशाली खेडकर, सरचिटणीस मोहिनी बडे, जिल्हा कोषाध्यक्ष रेखा नांदूरकर, तालुकाध्यक्ष नंदा राजपूत, सुनिता अहिरे, ॲड. पल्लवी तोडकर, रुपाली घाडगे, मनीषा खेडुलकर, सुनीता जोशी, प्रियांका घुगे, सुनीता पांडे, मनीषा वैजापूरकर आदी महिलांची उपस्थिती होती.