शिरडशहापूर / हिंगोली – औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील हजरत जिंदा शाहमदार उरुसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रविवारी 10 नोव्हेंबर रोजी हजारो भाविकांनी खिरीच्या महाप्रसादाचा लाभ घेतला .
सर्वधर्मसमभाव एकात्मतेचे प्रतीक असलेल्या हजरत जिंदाशहामदार यांचा शिरडशहापूर येथे उंच टेकडीवर दर्गा आहे. या उरुसासाठी जिल्ह्यासह पर जिल्ह्यातील सर्व धर्माचे भाविक येथे येऊन एकात्मतेचे दर्शन घडवितात. या उरुसानिमित्त 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता ढोल ताशाच्या गजरात गावातून संदल मिरवणूक काढण्यात आली.
उरूसनिमित्त येथे विविध स्टॉलची उभारणी करण्यात आली होती. बच्चे कंपनीसाठी आकाश पाळणे,मिकी माऊस,जम्पिंग झिपॉक आदीचा समावेश होता. 10 नोव्हेंबर रविवारी रोजी दर्गासमोर दुपारी धुमाळ चा कार्यक्रम झाला, धुमाळ नंतर दर्गा मैदानावर खिरीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी हजारो भाविक सहभागी झाले होते .
यावेळी खिरीच्या महाप्रसादासाठी , शिवार स्वामी महाराज, अहमद पठाण , अनिल सूर्य तळ,शेख जमीर, शेख निशु गुत्तेदार, ग्रामपंचायत सदस्यशेख गुलाम नबि,डिगांबर आकमार, संदीप बीचेवार, शेख साबेर, शिवाजी जोगदंड, अमान पठाण, रुस्तुम कुरुडे, शेख नसीब, सय्यद मोसिन, शेख नबी, दांडेगावकर, ज्ञानेश्वर पल्लये ,शेख मुकरम, मुजाहिद पठाण, शेख साजिद , शेख सलीम आदींनी सहकार्य केले .

















