Sunday, February 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

विजेतेपदासाठी कुमार गटात धाराशिव विरुद्ध सोलापूर;  राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत मुली गटात सांगली–ठाणे अंतिम लढत

तरुण भारतbyतरुण भारत
December 8, 2025
in sports
0
0
SHARES
125
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अहिल्यानगर – कुमार व मुलींच्या ५१व्या   राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत अंतिम फेरीचा महामुकाबला निश्चित झाला असून कुमार गटात गतविजेत्या धाराशिवची लढत सोलापूरशी, तर मुली गटात सांगली व ठाणे यांच्यात विजेतेपदासाठी थरार रंगणार आहे.

महाराष्ट्र  खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने श्री बाणेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बुन्हाणनगर येथे सुरू झालेल्या मुलींच्या पहिल्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या धाराशिवला ठाण्याने ४०–२३ असा दणदणीत पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. त्यांनी मध्यंतरापासूनच सामन्यावर नियंत्रण ठेवत १६–१० अशी आघाडी घेतली होती. ठाण्याच्या विजयात अक्षरा भोसलेने १६ गुण व १.१० मिनिटे पळतीचा खेळ सादर करत सिंहाचा वाटा उचलला. दीक्षा काटेकर (१.१७ मि. संरक्षण व ६ गुण), वैष्णवी जाधव (१, १.५८ मि. संरक्षण व ६ गुण) यांनीही चमकदार खेळी करत विजय पक्का केला. पराभूत धाराशिवकडून मैथिली पवार (२.३० मि. व १० गुण) एकटीने निकराचा प्रतिकार केला, तर श्रावणी गुंड व दुर्गा भोसले यांनी प्रत्येकी ४ गुण वसूल केले पण त्या आपल्या संघाला पराभवापासून वाचवू शकल्या नाहीत. 

मुलींच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात गत उपविजेत्या सांगलीने सोलापूरला २६–२३ असे १.५० मिनिटे राखून ३ गुणांनी हरवले. सांगलीकडून सानिया सुतार (१ मि. संरक्षण व ८ गुण) आणि सानिका चाफे (२.५०,  नाबाद १.३० मि. संरक्षण व २ गुण) यांनी अष्टपैलू खेळी केली. तर पराभूत सोलापूरच्या स्नेहा लामकाने (२.५०, १ मि. संरक्षण व ८ गुण) व प्राजक्ता बनसोडे (१.३० मि. संरक्षण व ४ गुण) यांचे प्रयत्न अपुरे पडले.

लघुत्तम आक्रमणाच्या तृतीय स्थानाच्या सामन्यात धाराशिवने सोलापूरला २४ सेकंदांनी हरवले.

——-

सोलापूरचा ‘ड्रीम’ गुणावर रोमांचकारी विजय

कुमारांच्या पहिल्या उपांत्य फेरीत सोलापूरने सांगलीला ३९–३८ असे एकाच गुणावर नमवित अंतिम फेरीत धडक मारली. नवीन नियमातील ‘ड्रीम’ गुण निर्णायक ठरला. मध्यंतरास १८–२० अशी पिछाडी असतानाही सोलापूरने शानदार पुनरागमन केले. त्यांच्या सिद्धार्थ माने देशमुख (१.५० मि. व ८ गुण), सुहाना आत्तार (१.३५ व ६ गुण), अरमान शेख (६ गुण) व शंभूराज चंदनशिव (६ गुण) यांनी आक्रमणाची धार कायम ठेवली. तर पराभूत सांगलीच्या अथर्व पाटील (३.१५ मि. संरक्षण व ८ गुण) व श्री दळवी (२ मि. संरक्षण व ४ गुण) यांचे प्रयत्न विजयासाठी अपुरे ठरले.

———

धाराशिवची पुण्यावर मात

कुमारांच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत गतविजेत्या धाराशिवने पुण्यावर ३२–१९ अशी मात केली. मध्यंतराची १२–१८ ही पिछाडी पुण्यास महागात पडली. धाराशिवकडून सोत्या वळवी (१, १.१० मि. संरक्षण व ८ गुण), जितेंद्र वसावे (२.२० मि. संरक्षण व २ गुण) व राज जाधव (२ मि. संरक्षण व ६ गुण) यांनी चमकदार खेळी केली. तर पराभूत पुण्याच्या शंकर यादव (१२ गुण) व आदेश पाटील (१.३०, २ मि. संरक्षण व ४ गुण) यांनी कडवी झुंज दिली.

तृतीय स्थानाच्या लघुत्तम आक्रमणाच्या सामन्यात सांगलीने पुण्यावर १.०३ मि. राखून विजय मिळवला.

——-

आता रंगणार सुवर्ण थरार

कुमार गटात सोलापूर विरुद्ध धाराशिव, तर मुली गटात ठाणे विरुद्ध सांगली या अंतिम सामन्यात  कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मैदानावर दमदार कौशल्य, वेग, चातुर्य आणि रणतंत्राची आतषबाजी बघायला मिळणार आहे.

Post Views: 188
Previous Post

थंडी वाढली : मुक्या जनावरून मायेची ऊब..! निसर्गप्रेमींनी गोठ्यामध्ये जाऊन केली जलजागृती

Next Post

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद — नागुर शाळेतूनी अनोखी जाणीव

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद — नागुर शाळेतूनी अनोखी जाणीव

ताज्या बातम्या

लाईट दुरुस्तीच्या कामावर गेलेल्या मनपा कंत्राटी कामगाराला चौघांनी केली बेदम मारहाण. #public

February 14, 2026

विठ्ठलास आमंत्रण ने मिळवले यश.#viral #public #solapurnews #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला..#mumbai #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला.. #mumbai #viral #पब्लिक #public

February 14, 2026

भविष्यात तरी कलाकारांना सुयोग्य न्याय दिला जाईल का नागरिकांचा सवाल?#viral #public

February 14, 2026

मंठा लोणार रोडवर दोन हायवा वाहनांवर कारवाई.#viral #marathinews #public

February 14, 2026

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची कारवाई 15 लाख रुपयांची अफूची झाडे जप्त.#vairal #solapurnews #public

February 14, 2026

वसमत मध्ये उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस युनिट सुरू.#viral

February 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0679860

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697