लोकसभा निवडणुकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन होणार आहे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत मोदी यांच्या सोबतच आता भारतीय जनता पार्टीचे 18 आणि मित्र पक्षांचे 18 मंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
मोदी यांच्या मंत्रिमंडळात एक चेहरा मात्र चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे सोलापुरातील लिंगायत समाजाचे नेते सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी यांचे व्याही व्ही सोमन्ना यांचा.
व्ही सोमन्ना हे कर्नाटक राज्यातील तुमकुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. सोमनाथ यांना केंद्रात मंत्री पद मिळत असून धर्मराज काडादी यांचे व्याही असल्याने त्याची चर्चा सोलापुरात होत आहे.
सिद्धेश्वर साखर कारखान्याची को जनरेशनची चिमणी पाडल्यानंतर धर्मराज काडादी यांनी लोकसभा निवडणुकीत प्रथमच राजकीय व्यासपीठावर येत उघडपणे भाजप विरोधात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांचा प्रचार केला. त्यामुळे प्रणिती शिंदे यांना चांगलाच फायदा झाला.