Saturday, June 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

काहींना कुटुंब हाच पक्ष वाटतो तर शिंदे साहेबांना कार्यकर्ता हेच कुटुंब वाटतं : प्रा. डॉ. ज्योती वाघमारे 

तरुण भारतbyतरुण भारत
March 9, 2026
in editor
0
काहींना कुटुंब हाच पक्ष वाटतो तर शिंदे साहेबांना कार्यकर्ता हेच कुटुंब वाटतं : प्रा. डॉ. ज्योती वाघमारे 
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य कष्टकरी कार्यकर्त्यांना संधी दिली. त्यांचाच वारसा पुढे चालवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यासारख्या गरीब, मागासवर्गीय कुटुंबातील मुलीला सर्वोच्च अशा सभागृहात खासदार केले. काहींना कुटुंब हाच पक्ष वाटतो तर शिंदे साहेबांनी कार्यकर्ता हेच कुटुंब मानले आहे असे सांगतानाच सर्वांना अभिमान वाटेल असं गल्लीतला आवाज दिल्लीत पोहोचवेन.लढत राहीन असेच पाठबळ द्या अशी भावना राज्यसभेच्या नूतन खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी केले.

     राज्यसभेवर खासदार म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर प्रा. डॉ. ज्योती वाघमारे या आज सोलापुरात आल्या असताना सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी विचारमंचावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे , अमर पाटील, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक मनीष केत, संघाचे सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे, जिल्हाध्यक्ष अभिषेक आदेप्पा , विश्वभूषण लिमये आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

           ज्योती वाघमारे पुढे म्हणाल्या, माझ्यासारख्या गरीब, मागासवर्गीय कष्टकऱ्यांच्या वस्तीत राहणाऱ्या एका पत्रकार , शिक्षिका असलेल्या मुलीला देशाच्या सर्वोच्च सभागृह असलेल्या राज्यसभेवर खासदार म्हणून पाठविले.  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामुळेच संधी मिळाली. खासदार पदाची मला कधी कल्पना नव्हती. अनेक दिग्गज प्रतिस्पर्धी समोर असताना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा वारसा जोपासत एकनाथ शिंदे साहेबांनी मला ही संधी दिली आहे. कोणतीही जात, धर्म न पाहता त्यांनी सामाजिक न्याय गतिमान केला आहे. काही लोक आपले कुटुंबच पक्ष समजतात मात्र एकनाथ शिंदे साहेब आपल्या कार्यकर्त्याला कुटुंब समजतात. एवढा धाडसी निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. विशेष म्हणजे त्यांनीच माझी डिपॉझिटही भरली आहे, असे ज्योती वाघमारे म्हणाल्या. 

          सोलापुरात एका जगजीवन राम वस्तीमध्ये राहणाऱ्या गरीबाच्या मुलीला पत्रकारितेच्या वारसा लाभला नसता तर मी इथपर्यंत पोहोचले नसते. त्यामुळेच मी इथे येताना श्रमिक पत्रकार संघाच्या पायरीवर नतमस्तक होऊन आत आले आहे. या पत्रकारितेने मला बोलण्याचे, लिहिण्याचे आणि विचार व्यक्त करण्याचे बळ दिले आहे. जेव्हा मी निवेदिका, पत्रकार , प्रवक्ता होते. प्रत्येक वेळेला पत्रकार बंधूनी मला भावाप्रमाणे पाठबळ दिले. साथ दिली. प्रत्येक संकटात, अडचणीमध्ये आणि यशातही खंबीरपणे पाठीशी राहिले म्हणून मी लढत राहिले. आज मी खासदार झाले नाहीतर तर प्रत्येक पत्रकार खासदार झाला आहे. सोलापुरात महायुतीतील एक पत्रकार नगरसेवक तर दुसरा एक पत्रकार खासदार झाला आहे. यामुळे पत्रकारांना आता अच्छे दिन आले आहेत असेही ज्योती वाघमारे यांनी सांगितले. 

    आज मी खासदार झाले आहे. एक निवेदिका, पत्रकार, शिक्षिका, मागासवर्गीय मुलगी म्हणून राज्यसभेत जात आहे. गल्लीतला आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवेन. सर्वांना अभिमान वाटेल असे लढत राहील, असेही त्या म्हणाल्या.

     या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्रमिक पत्रकार संघाचे खजिनदार किरण बनसोडे यांनी केले.

घोड्यावर बसून आल्या नूतन खासदार 

चार हुतात्मा पुतळा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे नूतन खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे या घोड्यावर बसून श्रमिक पत्रकार संघापर्यंत आल्या. त्यानंतर घोड्यावर बसूनच त्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत गेल्या. खासदार ज्योतीताई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है चा नारा कार्यकर्त्यांनी दिला.

Post Views: 49
Previous Post

संविधानामुळेच महिलांना सन्मानाचे आयुष्य मिळाले: डॉ. हुलगेश चलवादी

Next Post

महिला दिनानिमित्त सांगोल्यातील आपुलकीकडून गरजू महिलांना उपजीविकेच्या वस्तूंचे वाटप

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
महिला दिनानिमित्त सांगोल्यातील आपुलकीकडून गरजू महिलांना उपजीविकेच्या वस्तूंचे वाटप

महिला दिनानिमित्त सांगोल्यातील आपुलकीकडून गरजू महिलांना उपजीविकेच्या वस्तूंचे वाटप

ताज्या बातम्या

पाणीपुरवठा योजनेत शहरातील कोणताही भाग वंचित राहू नये : महापौर कोंडयाल

पाणीपुरवठा योजनेत शहरातील कोणताही भाग वंचित राहू नये : महापौर कोंडयाल

June 19, 2026
इंग्लिश स्कूल प्रशालेची स्वर्णश्री पाटील पुनर्मूल्यांकनानंतर दहावी बोर्ड परीक्षेत राज्यात प्रथम.

इंग्लिश स्कूल प्रशालेची स्वर्णश्री पाटील पुनर्मूल्यांकनानंतर दहावी बोर्ड परीक्षेत राज्यात प्रथम.

June 19, 2026

खताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाई ; ११३ परवान्यांवर कारवाई, ७ गुन्हे दाखल

June 19, 2026

तिर्थक्षेत्र पंढरपूरच्या विकासासाठी राज्य सरकारचा महत्वपुर्ण निर्णय

June 19, 2026

आयटीआय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी माजी आमदार संजय केनेकर यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा  

June 19, 2026
ब्रम्हपुरीची रिल स्टार रोहिणी पाराध्ये हिला आखेर  तब्बल 23 दिवसानंतर पोलिसांनी दिला न्याय

ब्रम्हपुरीची रिल स्टार रोहिणी पाराध्ये हिला आखेर  तब्बल 23 दिवसानंतर पोलिसांनी दिला न्याय

June 19, 2026
शिवसेना वर्धापन दिन निमित्य महारती

शिवसेना वर्धापन दिन निमित्य महारती

June 19, 2026

सीसीटीव्ही चा प्रश्न ऐरणीवर, चोरीचा छडा लावण्याचे पोलीस प्रशासनापुढे मोठे आव्हान?

June 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0920774

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697