वाशी तालुक्यातील संजय गांधी निराधार श्रावणबाळ सेवा योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना वाशी तालुक्यातील शासकीय गायरान पडीक जमिनीवर अतिक्रमण करून पिके काढून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत या प्रश्नावर नऊ जुलै 2024 रोजी दुपारी बारा वाजता वाशी तहसीलवर खालील मागण्यासाठी तीव्र धरणे निदर्शने कार्यक्रम करण्यात येणार आहे
यासाठी पुढील मागण्या वाशी तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवा योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ पेन्शन योजना यासाठी तीन महिन्याची पेन्शन त्वरित वाटप करावी निराधार ची मिरवणूक व उपासमारत थांबवावी. शासकीय पड गायरान जमिनीवर अतिक्रम करून भूमिहीन आणि त्यांचे रोजगारासाठी व कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी शासनाच्या 1989 च्या कायद्याप्रमाणे 1986 पासून गायरान जमिनी वहीती खाली आणून पिके काढून खात आहेत परंतु अनेक वेळा आंदोलने निर्दशने निवेदने देऊन देखील आपण कुठलीही कारवाही केली नाही
तरी वाशी तालुक्यातील दसमेगाव पारा पिंपळगाव( क) ब्रह्मगाव लाखनगाव दहिफळ इझोरा बावी मांडवा घाटपिंपरी गोलेगाव पिंपळगाव( लिंगी) आदी गावातील शासकीय पड घरात जमिनीवर अतिक्रमण करून गायरान जमिनी वहीती खाली आणून पिके काढून उदरनिर्वाह भागवत आहेत तरी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 व महाराष्ट्र जमीन महसूल नियम 16 व 17 प्रमाणे जमिनीची तपासणी करण्याचे आदेश देण्यात यावेत तसेच अतिक्रमित शेतकरी यांच्यावर कायदेशीर दंड करून गाव नमुना १ई नोंद घेऊन जिन्नसवार पेरलेल्या पिकाची ७/१२ मधील स्तंभ ११ मधील शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकाचा राष्ट्रीय उत्पादन वाढीस नोंद करण्याचे आदेश करण्यात यावेत तरी जाणीव संघटनेच्या वतीने दि.९/०७/ २०२४ रोजी दुपारी१२ वाजता तहसील समोर तीव्र धरणे निदर्शने आंदोलन करण्यात येईल
असे निवेदन जी. जे.तवले अव्वल कारकून महसूल यांना जाणीव संघटनेच्या वतीने जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे सुभाष गाडे तालुका अध्यक्ष भारत धावारे विष्णू धावारे उद्धव छत्रे आदि ने दिले आहे व त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.