जेऊर – सामाजिक कार्यकर्ते संजय अप्पा साळुंके यांच्या संकल्पनेतून अन दातृत्वातून श्रीदत्त जन्मोत्सव मंडळ कोंढारचिंचोली,ता.करमाळा येथे सलग १२ वर्षे आदर्श उपक्रम समाजामधे राबवत आहेत.यानिमित्ताने त्यांनी पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी जाहिर व्याख्यान व सामाजिक पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करून
करमाळा तालुक्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यां व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. यामध्ये विशेष पुरस्कार म्हणून पक्षीमित्र प्रा.कल्याणराव साळुंके व आदर्श शिक्षक प्रा.बाळकृष्ण लावंड सर यांना श्री दत्त सेवाभूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सुयश निलकंठ शिंदे,सलोनी सतिशराव भोसले,डॉ. कु. वैष्णवी मुरलीधर गलांडे,अनिकेत दत्तात्रय तावरे,बिनाली बाळासाहेब कांबळे,अॅड.अभिजीत सुरेश कांबळे,ऋतुजा तात्यासाहेब कांबळे, स्वराज बाळासाहेब बोडके,गणेश मनोहर तावरे,हनुमंत गलांडे साहेब,अॅड. श्री. सौरभ संतोष भोसले यांना विशेष स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळेस विचारपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मराठा महासंघाचे अध्यक्ष प्रा.राजकुमार मस्कर सर,कार्यक्रमाचे आयोजक संजय अप्पा साळुंखे,प्रा.जयेश पवार,प्रा.विष्णु शिंदे , पाटबंधारे विभागाचे अभियंते अतुल दाभाडे,गावचे सरपंच उपसरपंच,पोलिस पाटील आदि मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते यानिमित्ताने प्रसिद्ध व्याख्याते राहुल गिरी सरांचे आम्ही तुफानातील दिवे या विषयावर अतिशय अभ्यासपूर्ण व प्रबोधनात्मक व्याख्यान संपन्न झाले.व्याख्यानानंतर रिलस्टार कु. रितीका सचिन जांबले पाटील या विद्यार्थीनीने आपली नृत्यकला सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा.गणेश करे-पाटील यांनी केले,मान्यवरांचा परिचय अनिकेत कांबळे,सूत्रसंचालन प्रा.सुहास गलांडे यांनी केले तर आभार शेतकरी संघटनेचे नेते निळकंठ शिंदे यांनी मानले.


























