Friday, February 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

न्यायालय, पोलिस व महसूल कामकाजाची प्रत्यक्ष ओळख : कुंभेजच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा

तरुण भारतbyतरुण भारत
January 15, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जेऊर – कुंभेज,(ता.करमाळा) येथील दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालय आणि यशकल्याणी सेवाभावी संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी न्यायालय, पोलीस मुख्यालय व तहसील कार्यालय येथे एक दिवसीय शैक्षणिक सहल व अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला.

यशकल्याणी संस्थेच्या सहकार्याने विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमंत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार उपक्रमशील शिक्षक पक्षीमित्र कल्याणराव साळुंके यांनी या अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले. यादरम्यान विद्यार्थ्यानी करमाळा न्यायालय येथे न्यायदान  कक्षात प्रत्यक्ष खटल्याचे कामकाज कसे चालते, पक्षकार , विधीज्ञ आणि न्यायाधीश यांची न्याय प्रक्रियेतील भूमिका इत्यादी बाबत सविस्तर निरीक्षणे नोंदवली. 

महसुल विभागाचे प्रमुख ,तालुका मुख्य कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार यांच्या अधिकार कक्षा , विविध विभाग, सामान्य नागरिकांप्रती प्रशासनाची बांधिलकी , गुन्हेगार  व आरोपींचे कारागृह आदीबाबत माहिती  घेतली. 

   यावेळी विद्यार्थ्यांनी कारागृहाची प्रत्यक्ष पाहणी करत कैद्यांचे जीवन, सुधारगृहाची भूमिका व कायद्याचे महत्त्व समजून घेतले.

कर्तव्यदक्ष तहसीलदार मा. शिल्पा ठोकडे  यांनी विद्यार्थाना मार्गदर्शन करतना शालेय वयातील आपले अनुभव सांगितले व लोकसेवेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यानी स्पर्धा परीक्षेतून प्रशासकीय अधिकारी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले. 

उपविभागीय पोलिस अधिकारी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा व्ही. एस.  यांच्या कार्यालयास भेटी दरम्यान विद्यार्थ्यानी  त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला . अंजना कृष्णा यांनी विद्यार्थ्यांना आपली आवड ओळखून आपले क्षेत्र निवडा असा सल्ला दिला. तसेच कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हा परंतू त्याआधी एक चांगला माणूस व्हा असा सल्ला त्यांनी आवर्जून दिला.

पोलिस मुख्यालयात प्रा.गणेश करे पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत आपले प्रेरणादायी विचार मांडले. प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यामधे सौहार्दपूर्ण संबंध निर्माण करायचे असेल तर प्रशासनाने लोकाभिमुख होण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले व अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण विद्यार्थी अभ्यास दौऱ्यास प्रशासनाने केलेले सहकार्य प्रशंसनीय असून यशकल्याणी संस्था अशा उपक्रमांसाठी नेहमी पुढाकार घेऊन सहकार्य करेन असे आश्वासन दिले.

मुख्याध्यापक हनुमंत पाटील यांनी आपल्या मनोगतातून हा उपक्रम विद्यार्थ्यांचे अनुभवविश्व समृद्ध करणारा असून यासाठी विद्यालयाची नेहमी सकारात्मक भूमिका असेन असे सांगितले.

 ए.पी.आय. व निर्भया पथक प्रमुख गिरिजा म्हस्के यांनी  प्रशासन, कायदा व सुव्यवस्थेच्या विविध पैलूंविषयी मार्गदर्शन केले. 

पो.कॉ. मंगेश पवार यांनी पिस्तुल, राइफल,कार्बाइन आदी शस्त्रांबाबत माहिती दिली. 

या संपूर्ण अभ्यास दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अधिकाऱ्यांनी समर्पक उत्तरे देत शासकीय यंत्रणेची कार्यपद्धती स्पष्ट केली.

 अभ्यास दौऱ्यात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना यशकल्याणी संस्थेच्या वतीने प्रा.गणेश करे पाटील यांचे हस्ते सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच प्रवासासाठी वातानुकूलित बस आणि अल्पोपहाराची व्यवस्थाही संस्थेकडून करण्यात आली होती. 

या अभ्यास दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष अनुभव मिळाल्याने त्यांची प्रशासनविषयक समज अधिक व्यापक झाली.

या अभ्यास दौऱ्याप्रसंगी   आयपीएस मा.अंजना कृष्णा व्ही. एस. तहसीलदार मा. शिल्पा ठोकडे, यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा. करे-पाटील, एपीआय गिरिजा म्हस्के, बागल विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमंत पाटील, जीवन शिक्षण फाउंडेशनचे संचालक प्रा.जयेश पवार, पक्षीमित्र कल्याणराव साळुंके , निर्भया पथकचे पो कॉ. संभाजी पवार, पो.कॉ. मंगेश पवार,पो कॉ गणेश गुटाळ , पो कॉ. विद्या इंगोले सेवक संतोष घोरपडे, सेवक नंदकुमार कांबळे उपस्थित होते .

Post Views: 28
Previous Post

सहकार महर्षि विचारांचा जागर; 108 वी जयंती व पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न

Next Post

महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान १०२ जागांसाठी ५६४ उमेदवार निवडणूक रिंगणात

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान १०२ जागांसाठी ५६४ उमेदवार निवडणूक रिंगणात

ताज्या बातम्या

खंदक बागेत अचानक लागली आग.. #solapurnews #solapur #popular #mh13newssolapur

February 26, 2026

NMMS परीक्षेत लोकनेते काकासाहेब चौधरी माध्यमिक विद्यालयाचे यश..#public #school #students #viral

February 26, 2026

रामभाऊ जोशी हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश #public #viral #tranding #school

February 26, 2026

अतिरिक्त उत्खननाचा ग्रामस्थांचा आरोप..#public #viral

February 26, 2026

पत्रकार सचिन शिंदे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा.. #public #marathinews #viral

February 26, 2026

रामनवमी 2026 ची नियोजन बैठक संपन्न. #public #ramnavmi #tranding #ram #ramrajya #jayshreeram

February 26, 2026

सोयगाव येथे आई महोत्सावा निमित्त जि.परिषद केंद्र प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी

February 26, 2026

बापरे ssss.. शहर जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला.. #public #marathinews #viral #temperature #mh13

February 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0706764

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697