Thursday, September 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सहकार महर्षि विचारांचा जागर; 108 वी जयंती व पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न

तरुण भारतbyतरुण भारत
January 15, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
21
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – सहकार क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तीमत्व आणि आधुनिक माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांची 108 वी जयंती महर्षि संकुल यशवंतनगर येथे अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून प्रशालेतील पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला. 

       कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी रामचंद्र गजाबा गायकवाड संचालक शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज ,डॉक्टर सुरज पवार त्वचारोग तज्ञ संग्रामनगर, प्रमुख व्याख्याते डॉक्टर प्रेमनाथ रामदासी साहित्यिक, अॅड नितीनराव खराडे सभापती प्रशाला समिती लाभले होते.

           सर्व प्रमुख मान्यवरांचे स्वागत महर्षि बाल वाद्यवृंदांच्या बालचमूंमार्फत स्वागत गीताने करण्यात आले.

       भविष्यातील अनंत काळापर्यंतच्या पिढ्यांना नवचैतन्य, प्रेरणा आणि स्फूर्ती देणारा झरा व ग्रामीण भागातील सामान्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील असे मत प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केले.

    प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते, सहकाराचे मेरुमणी सरकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.

   संकुलातील विद्यार्थिनी भूमिका कारमकर व श्रावणी मोहिते यांनी आपल्या ओघवत्या भाषाशैलीत काकासाहेबांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.

    आजच्या डिजिटल युगातही प्रशालेच्या विद्यार्थ्यांना आपल्या सुप्त कलागुणांची उधळण करण्याची संधी देणाऱ्या व प्रशालेच्या गत दोन वर्षातील कामगिरीचा वाढता आलेख दर्शवणाऱ्या महर्षी द्वैवार्षिक अंकाचा प्रकाशन सोहळा प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते व्यासपीठावर संपन्न झाला. 

   प्रमुख व्याख्याते डॉक्टर प्रेमनाथ रामदासी यांनी आपल्या व्याख्यानातून सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत सहकार आणि शिक्षणाचे जे रोपटे लावले त्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. त्यांच्या विचारांवर चालणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल .विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता सहकार महर्षिंच्या जीवनातून जिद्द आणि कष्टाचे धडे गिरवले पाहिजेत असा विचार व्यक्त केला. 

        शैक्षणिक वर्षभरात विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये  व राज्यस्तरीय लेझीम स्पर्धेमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

   सोलापूर जिल्हा शिक्षक पतसंस्था बाळे यांच्यामार्फत दिले जाणारे आदर्श शिक्षक पुरस्कार सहशिक्षिका रचना सतीश रणनवरे, आदर्श प्रयोगशाळा सहाय्यक पुरस्कार प्रकाश गोपीनाथ गवळी यांना नुकताच जाहीर झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

   संग्रामसिंह मित्र मंडळ आयोजित राज्यस्तरीय लेझीम स्पर्धेमध्ये उत्कृष्ट लेझीम प्रशिक्षक पुरस्कार सहशिक्षक इलाही बागवान यांना मिळाल्याबद्दल संकुलामार्फत मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

      प्रमुख अतिथी डॉक्टर सुरज पवार त्वचारोग तज्ञ यांनी आपल्या मनोगतातून प्रशालेतील विद्यार्थ्यांना सहकार महर्षिंच्या ठायी असणाऱ्या गुणांचे अवलोकन करून यशाचे उत्तुंग शिखर गाठण्याचे आवाहन केले.

    मान्यवरांच्या शुभ हस्ते मकर संक्रांतीनिमित्त प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांना तिळगुळ वाटप करण्यात आले.

    कार्यक्रमासाठी प्रशाला समिती सदस्य नवनाथ पांढरे, कैलास चौधरी ,अनिल जाधव विनोद जाधव ,नितीन इंगवले देशमुख ,जया गायकवाड ,मुख्याध्यापक शिवाजी पारसे ,मुख्याध्यापिका अनिता पवार, उपमुख्याध्यापक आसिफ झारेकरी उपस्थित होते.

   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश सोनवणे यांनी केले तर आभार पर्यवेक्षक उमेश बोरावके यांनी मानले.

   कार्यक्रमाची सांगता सारे जहाँ से अच्छा या समूहगीताने झाली.

Post Views: 86
Previous Post

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात जिजाऊ जयंती व राष्ट्रीय युवा दिन उत्साहात साजरा 

Next Post

न्यायालय, पोलिस व महसूल कामकाजाची प्रत्यक्ष ओळख : कुंभेजच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

न्यायालय, पोलिस व महसूल कामकाजाची प्रत्यक्ष ओळख : कुंभेजच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा

ताज्या बातम्या

रोबोटने केले पवारांचे स्वागत…. #viral #news #marathinews

September 23, 2026

दुःख सांगत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात फोडला हंबरडा #viral #news #marathinews

September 23, 2026
सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलात श्री गणेशाला भावपूर्ण निरोप

सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलात श्री गणेशाला भावपूर्ण निरोप

September 23, 2026
महापालिका , मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचा संयुक्त उपक्रम

महापालिका , मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचा संयुक्त उपक्रम

September 23, 2026
बाळीवेस शक्तिपूजा समाजसेवा मंडळाच्या अध्यक्षपदी थोबडे

बाळीवेस शक्तिपूजा समाजसेवा मंडळाच्या अध्यक्षपदी थोबडे

September 23, 2026
स्वामी विवेकानंद पोलीस पब्लिक स्कूल मधील (U-14) मुली रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये यश

स्वामी विवेकानंद पोलीस पब्लिक स्कूल मधील (U-14) मुली रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये यश

September 23, 2026
तायक्वांदो स्पर्धेत एमआयटीच्या सूर्यतेज पाटीलची जिल्हास्तरावर निवड

तायक्वांदो स्पर्धेत एमआयटीच्या सूर्यतेज पाटीलची जिल्हास्तरावर निवड

September 23, 2026
सामंजस्यामध्ये समाजातीलच नव्हे तर जगातील प्रश्न सोडविण्याची शक्ती : ॲड. मिलिंद थोबडे 

सामंजस्यामध्ये समाजातीलच नव्हे तर जगातील प्रश्न सोडविण्याची शक्ती : ॲड. मिलिंद थोबडे 

September 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1249850

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!