तभा फ्लॅश न्यूज/नवीन नांदेड : सिडको येथील गरीब कुटुंबातील रहिवासी वैभव शिवकुमार पईतवार याने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग परीक्षा (एमपीएससी) उत्तीर्ण होऊन महसूल सहाय्यक म्हणून मुंबई येथे त्यांची निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा मार्फत राज्य सरकार हे विविध सरकारी पदांची भरती करत असते म्हणून हेच ध्येय मनाशी धरून वैभव शिवकुमार पईतवार हा एक गरीब कुटुंबातील विद्यार्थी त्याने इयत्ता दहावी वर्गात शिकत असताना वयाच्या सोळाव्या वर्षी त्याला विजेचा शॉक लागून त्याचे दोन्ही हात गमावून बसला. त्यानंतर त्याने खचून न जाता पुढील शिक्षण चालू ठेवत समाजकार्य शिक्षण (एमएसडब्ल्यू) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे घेऊन.
यापुढेही त्यांनी आपली जीवन जगणे कठीण असल्याचे डोक्यात घेऊन जळगाव येथील “मनोबल दीपस्तंभ” अकॅडमीत अभ्यास करून एमपीएससी परीक्षा पास झाल्याने त्यांची महसूल सहाय्यक पदी निवड झाल्यामुळे दिव्यांग वैभव पईतवार यास राजकीय, शासकीय, शाळा, महाविद्यालय, समाज बांधव व जनतेच्या वतीने त्याच्या पुढील कार्यास शुभेच्छा देऊन कौतुक करत आहेत. दोन्ही हात नसताना ही वैभवने जिद्द, लग्न व मेहनतीने आपले ध्येय गाठले आहे त्याच्या या कार्यास पूर्ण परिसर सलाम करत आहे