Monday, November 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सरकारकडून दुर्लक्ष? थकीत हप्ते न भरल्याने नागरिकांचा आक्रोश, मोफत वाळूसाठी उपोषण

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 22, 2025
in maharashtra
0
सरकारकडून दुर्लक्ष? थकीत हप्ते न भरल्याने नागरिकांचा आक्रोश, मोफत वाळूसाठी उपोषण
0
SHARES
81
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तभा फ्लॅश न्यूज/माहूर : प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत माहूर शहरात घरकुले मंजूर झालेल्या नागरिकांनी जुनी राहती घरे पाडून घरकुलांचे बांधकामे सुरु केली. शासनाचे अनुदानाचे पैसे लवकर मिळतील या अपेक्षेने अनेकांनी पदरमोड व उधार उसनवार, खासगी कर्जे घेऊन अनेकांनी घरकुलांचे बांधकाम पूर्ण केले,परंतु घरकुलाचे संपूर्ण हप्ते अद्याप पर्यत मिळाले नाहीत.

पहिल्या डीपीआर मधील ७६ लाभार्थ्यांना मंजूर २ लाख ५० हजार रुपये अनुदान पैकी केवळ २ लाख ३० हजार रुपये मिळाले असून उर्वरित २० हजार रुपये अद्यापही थकीत आहेत. एकूण चार डीपीआर मधील १,१०३ लाभार्थ्यांपैकी १,०२७ लाभार्थ्यांचे ५० हजार रुपयांचे हप्ते अद्याप थकीत आहेत. अनुदानाचे पैसे वेळेत न मिळाल्याने लाभार्थी आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे सदर लाभार्थ्यांचे थकीत असलेले हप्ते तातडीने लाभार्थ्यांना देण्यात यावेत ,अशी विनंती करूनही शासनाकडून घरकुल लाभार्थ्यांची रक्कम मिळाली नसल्याने तसेच आनंद पाटील तूपदाळे यांनी वारंवार मुख्यमंत्री, पालकमंत्री , खासदार, आमदार , जिल्हाधिकारी,मुख्याधिकारी यांना निवेदने देऊनही दखल झाली नसल्याने नाईलाजाने आज दि. 22 जुलै रोजी तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तूपदाळे यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

माहूर शहरातील अनेक नागरिकांकडे स्वतःच्या जागा उपलब्ध नाहीत अशा लाभार्थ्यांना पंतप्रधान घरकुल योजने अंतर्गत म्हाडा तर्फे घरकुल बांधकाम करण्यासाठी शासनामार्फत जागा उपलब्ध करून देऊन घरकुल योजनेचा लाभ देणे आवश्यक आहे.

शासनाच्या विविध आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना मोफत ५ ब्रास रेती उपलब्ध करून देण्याचेही आदेश देण्यात आले. त्यानुसार माहूर शहरातील आवास योजनांच्या ६०० लाभार्थ्यांना ५ ब्रास रेतीचे मोफत वाहतूक पास देणे आवश्यक असतांना माहूर तालुका प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाच्या अभावाने केवळ ४० लाभार्थ्यांना मोफतमध्ये केवळ ३ ब्रास रेती ती सुद्धा अत्यंत निकृष्ट दर्जाची रोडा मिश्रित रेती उपलब्ध करून देण्यात आली. ५४० लाभार्थी आद्याप मोफत ५ ब्रास रेती पासून वंचित आहेत.

करिता उर्वरित ५४० आणि आधीचे हजारो लाभार्थ्यांना तातडीने मोफत ५ ब्रास रेती उपलब्ध करून द्यावी यासह इतर मागणी घेऊन काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुपदाळे यांचेसह शेकडो नागरिक भर पावसाळ्यात माहूरच्या तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणास बसले आहेत.

Views: 67
Previous Post

दिव्यांग वैभव पईतवारची महसूल सहाय्यक पदी निवड

Next Post

गुटखा विरोधात पोलिसांची मोहीम; देगलूरमध्ये पावणे सहा लाखांचा गुटखा जप्त!

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
गुटखा विरोधात पोलिसांची मोहीम; देगलूरमध्ये पावणे सहा लाखांचा गुटखा जप्त!

गुटखा विरोधात पोलिसांची मोहीम; देगलूरमध्ये पावणे सहा लाखांचा गुटखा जप्त!

ताज्या बातम्या

सूर, संगीत अन् आठवणींची मैफल; प्रिसिजन गप्पांचा दुसरा दिवस संस्मरणीय!

November 22, 2026
राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजा व जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू दे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडे

राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजा व जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू दे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडे

November 21, 2026

विठ्ठलाच्या महापूजेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संतपूजा

November 21, 2026
घुमाण सायकल वारीचा प्रवास प्रेरणादायी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

घुमाण सायकल वारीचा प्रवास प्रेरणादायी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

November 21, 2026
कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सुमारे ५ टन फुलांची आकर्षक सजावट

कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सुमारे ५ टन फुलांची आकर्षक सजावट

November 21, 2026
हिंगुलांबिका प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद रमेश हंचाटे यांना पीएच. डी. प्रदान

हिंगुलांबिका प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद रमेश हंचाटे यांना पीएच. डी. प्रदान

November 21, 2026

जि.प.च्या सर्व साधारण सभेत ३९.५६ कोटींच्या कामांना हिरवा कंदील!

November 21, 2026
महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन

महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन

November 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1551381

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!