सोलापूर – दक्षिण तालुक्यातील निंबर्गी पंचायत समिती गण अनूसूचित जातीसाठी आरक्षित आहे. या गणातून शैलजा सिद्धाराम जानकर या निवडणूक लढण्यास इच्छुक असून भाजपाकडून त्यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आली आहे.
गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणे, महिलांच्या अडचणी सोडविण्यासाठी जानकर नेहमी प्रयत्नशील असतात. शिवाय शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे या सगळ्या बाबतीत जानकर दाम्पत्याची कामगिरी वाखणण्याजोगे आहे .
डॉ. चनगोंडा हवीनाळे यांचे जवळचे विश्वासू उमेदवार
निंबर्गी पंचायत समिती गणातून भाजपच्या शैलजा सिद्धाराम जानकर यांना उमेदवारी मिळाल्यास त्याचा फायदा हत्तूर जिल्हा परिषद गटातील भाजप उमेदवाराला होण्याची शक्यता असून, दोन्ही ठिकाणी संघटित मतांचे प्रभावी हस्तांतर होणार आहे. अशी राजकीय जाणकारांची चर्चा आहे. चिंचपूर , बरूर, टाकळी व कुरघोटसह इतर गावात सामाजिक कार्याच्या माध्यमातून सिध्दाराम जानकर यांनी कार्यकर्त्यांची जाळे विणले आहे.
दक्षिण पंचायत समितीवर कमळ फुलविण्यासाठी शैलजा जानकर यांना उमेदवारी देणे गरजेचे असल्याचे कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे. त्यामुळे आमदार सुभाष देशमुख यांनी शैलजा जानकर यांना उमेदवारी देण्याची मागणी होत आहे.























