सोलापूर – सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी आस्था सामाजिक संस्थेस राज्य उत्पादन शुल्क विभागात थंडीची चाहूल लक्षात घेऊन फुटपाथवरील वंचित बेघर निराधार यांना 150 ब्लॅंकेट वाटप करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षिका भाग्यश्री जाधव मॅडम आणि पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील सीताराम महाराज साखर कारखान्याचे मुख्य अधिकारी डॉ राजलक्ष्मी गायकवाड यांच्या माध्यमातून 150 ब्लॅंकेट वाटण्यासाठी आस्था सामाजिक संस्थेकडे सुपूर्द करण्यात आले.
हे सर्व ब्लॅंकेट एमआयडीसी अक्कलकोट रोड येथील गरीब, वंचित ,बेघर ,निराधार महिलांना व शिरापूर येथील गरीब शेतकरी महिलांना ब्लॅंकेट वाटप करण्यात येणार आहे
या प्रसंगी आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी, प्रसिद्धी प्रमुख सुहास छंचुरे, पिंटू कस्तुरे उपस्थित होते


























