सोलापूर – मागास समाजसेवा मंडळ संचलित जागृती विद्यामंदिर नेहरूनगर येथे क्रीडा सप्ताहास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.
याचे उद्घाटन उत्तर सोलापूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बापू जमादार, कुमठे केंद्राचे केंद्रप्रमुख वाघमोडे व तरुण भारतचे वृत्तसंपादक अजितकुमार संगवे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य विजयरत्न चव्हाण होते.
सर्वप्रथम ध्वजारोहण करून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांना प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी संचलन करून मानवंदना दिली. त्यानंतर खेळाडूंनी क्रीडा ज्योत घेऊन प्रमुख अतिथींना क्रीडाजोत समर्पित केले मैदानाची पूजा करून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थी खेळाडूंना विद्यार्थिनी पवित्रा पुजारी हिने क्रीडा शपथ दिली. प्रास्ताविकेत क्रीडाशिक्षक संतोष जाधव यांनी क्रीडा धोरण व प्रशालेतील क्रीडा विभागाचे कामकाज आणि खेळाविषयीचे महत्व याची माहिती दिली. शिक्षक एस. एस. कोरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कुमठे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. वाघमोडे यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना क्रीडा धोरण व खेळ यांचे महत्त्व पटवून दिले. क्रीडा धोरणानुसार राज्य पातळीवर राष्ट्रीय पातळीवर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या खेळाडूंना नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण असल्याबाबतची माहिती व तसेच पोलीस भरतीला अडीच इंच उंचीची सवलत या खेळाडूंना मिळते.
श्री. संगवे यांनी आपल्या मनोगतातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावर राज्यस्तरावर प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रेस गुण मिळाले जातात याची माहिती सांगितली.
प्रमुख उद्घाटक श्री. जमादार यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व पटवून देऊन सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य चव्हाण यांनी क्रीडा सप्ताह बाबत माहिती सांगून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी हा क्रीडा सप्ताह चे आयोजन करण्यात येतो आणि सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुकही मनोगतातून केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक संतोष जाधव यांनी केले. प्रा. श्रीयुत सगेल यांनी आभार मानले.

















