मुखेड – मुखेड तालुक्यातील सांगवी बेनक येथील श्री संत मन्मथ स्वामी माध्यमिक विद्यालयात दि.१ डिसेंबर रोजी सावित्रिच्या लेकींची पायपीट थांबवण्यासाठी बाहेर गावाहून शिक्षणासाठी येणा-या मुलींना सायकलींचे वाटप पुणे येथिल दि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्स मॅट्रोपॉलीस यांच्या वतीने श्री संत मन्मथ स्वामी विद्यालयातील बाहेर गावाहून शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या मुलींना मोफत ३० सायकलींचे वाटप
सांगवी बेनक येथील युवा उद्योजक तथा लायन्स मॅट्रोपॉलीस क्लब्सचे नियिजन चेअरमन पांडूरंग भिमराव मस्कले यांच्या माध्यमातून जन्म गावी शिकलेल्या शाळेला बाहेर गावाहून शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या मुलींचे शिक्षणाची गैरसोयीचे होऊनये म्हणुन मोफत सायकल वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक बालाजी होनशेट्टे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील लायन्स क्लब मॅट्रोपॉलीस चे अध्यक्ष
रामचंद्र माने, वरीष्ठ सदस्य तथा मार्गदर्शक दत्तात्रय गव्हाचे,भरत इंगवले,गुलशन पाल,शंकर गावडे,किरण आल्हाट, पांडुरंग मस्कले,पांडूरंग गव्हाणे, सोमनाथ जगदाळे,लक्ष्मण दंनतराव,
सरपंच प्रतिनिधी मिलिंद जोंधळे, चेअरमन विजयकुमार मस्कले, शंकरराव होनशेट्टे,माजी सरपंच सूर्यकांत मस्कले, दत्ता भालके,
मुख्याध्यापक एम.आर.मोमिण, एकनाथ डुमणे,
बालाजी करडखेले,शाम मस्कले, बालाजी क्यादापुरे ,भागवत कपाळे उद्देश चौधरी,भैयासाहेब गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती साविञिबाई फुले यांच्या प्रतिमेस दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष रामचंद्र माने,गुलशनपाल,भरत इंगवले, शंकर गावडे,किरण आल्हाट व येथील भुमिपुत्र पांडुरंग मस्कले यांनी आपले विचार मांडले तर अध्यक्षीय समारोप
बालाजी होनशेट्टे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना दत्तात्रय कांबळे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक एम.आर.मोमीण यांनी मानले,या प्रसंगी शाळेतील माजी विद्यार्थी मारोती आचमारे, बालाजी क्यादापुरे,मेघराजा बळते,वैभव होनशेट्टे, शाम मस्कले, माधव मस्कले,बाळू हिप्परगे,गजानन मस्कले यासह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक एम.आर.मोमीण, के.जि.केसे,
डी.जि.कांबळे, एम.एस.सावरगावे,गजानन होनशेट्टे,मालती चमकुरे,संगिता गित्ते,शिवानी होनशेट्टे, विश्वास चमकुरे,सुभाष होनशे्टे,गणेश मस्कले,विजय घाळे यांनी परिश्रम घेतला.























