नांदेड – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे मा. राज्यपाल यांच्या कार्यालयामार्फत पुरस्कृत २७ वा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव – २०२५ यावर्षी दि. ४ ते ८ डिसेंबर २०२५ या कालावधीत उत्साहात आयोजित करण्यात आला आहे.
राज्यातील विविध विद्यापीठांच्या क्रीडापटूंना एकत्र आणणारा हा भव्य सोहळा विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर रंगणार आसुन येथील क्रीडा विभागाकडून करावयाची मैदानावरील कामे अजूनही चालू असल्याचे चित्र दिसून येते सदरील कामे वेळेवर न पूर्ण होण्याचे कारण म्हणजे टेंडरिंग वेळेवर न सुटल्याने झाले असल्याचे संबंधितांकडून कळाले सदरील कामे वेळेत होण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू यांनी लक्ष लक्ष देण्याची गरज आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे घेण्यातयेणाऱ्या क्रीडा महोत्सव-२०२५
या क्रीडा महोत्सवात बॅडमिंटन, टेबल टेनिस, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, खो-खो, कब्बडी, बुद्धिबळ आणि ॲथलेटिक्स (रनिंग, उंच उडी, लांब उडी इत्यादी) या आठ क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. राज्यातील २४ विद्यापीठातील १७२१ मुले आणि १५८६ मुली असे एकूण ३३०७ खेळाडू सहभागी होणार आहेत. खेळाडूसह मार्गदर्शक आणि व्यवस्थापकांची संख्या ५७६ असणार आहे. तसेच या स्पर्धेकरिता २७६ पंचांची नियुक्ती विद्यापीठातर्फे करण्यात आलेली आहे.
विशेष म्हणजे यावर्षी मा. राज्यपाल महोदयांच्या सुचनेनुसार विद्यापीठाने पहिल्यांदाच ‘भारत पोर्टल’ नावाने लिंक तयार केलेली आहे. या लिंकद्वारे यावर्षी स्पर्धा भारतभर बघता येणार आहेत. असा प्रयोग करणारे ‘स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड’ हे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ आहे. आणि हा विद्यापीठासाठी एक बहुमान आहे. क्रीडा महोत्सवाची जय्यत तयारी विद्यापीठ परीसरामध्ये सुरु आहे.
याकरिता विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर आणि प्र-कुलगुरु डॉ. अशोक महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन, तांत्रिक, पात्रता, निवास, वैद्यकीय, अहवाल लेखन, निधी संकलन, खरेदी व वित्त, सांस्कृतिक, क्रीडा ज्योत, बक्षीस वितरण, पाणी वाटप, विद्युत व्यवस्था, प्रोटोकॉल व फ्लॅग, तक्रार निवारण, वाहतूक, भोजन प्रसिद्धी व वृत्तांकन, स्वच्छता, क्रीडा साहित्य वाटप, कार्यालयीन कामकाज आदी २८ समित्या स्थापन करण्यात आलेली आहेत. सर्व समित्यांमध्ये विद्यापीठ परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यापीठ परिसरातील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी आदींचा समवेश आहे.

















