सोलापूर – ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यात्रा व नूतन वर्षाचे औचित्य साधून विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शासकीय महिला रुग्णालय व इतर रुग्णालय येथे ६० नवजात बालकांना उपयुक्त असणारे बेबी किट वाटप करण्यात आले.मंडळाच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या कार्यक्रमास रुग्णालयाचे मान्यवर डॉक्टर्स व स्टाफ,विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक सदस्य विजय शाबादी,निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी अशोक भांजे,ज्येष्ठ नागरिक सिद्धराया होर्तीकर,मध्यवर्ती मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट चे सचिव विश्वनाथ आमणे,महिला पदाधिकारी सुरेखा गोब्बूर,सुजाता आमणे आदी मान्यवर उपस्थित होते.
शेवटी मध्यवर्ती मंडळाचे सेक्रेटरी प्रसाद गाजरे यांनी आभार मानले.या उपक्रमासाठी डॉ.प्रशांत दौंड, करजगीकर बंधू,इनामदार परिवार, शाबादी परिवार यांचे विशेष सहकार्य लाभले.


















