Tuesday, April 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत! उमाबाई श्राविका विद्यालयात डॉ.सुहासिनी शहा यांचे प्रतिपादन

तरुण भारतbyतरुण भारत
January 10, 2026
in solapur
0
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – श्राविका संस्थानगर येथील उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत थाटामाटात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या विश्वस्त अंजली शहा तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.सुहासिनी शहा, पी. एस. व्ही. ट्रस्टचे विश्वस्त करण शहा, देवई शहा, प्रिसिजन फाउंडेशन चे समन्वयक माधव देशपांडे,प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे, मार्गदर्शिका दीप्ती शहा, उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ, इंग्लिश मीडियम जुनियर कॉलेजचे प्राचार्य विलास लेंगरे, आयटीआयचे प्राचार्य पाटील सर, ग्रंथपाल रत्नपारखे सर, चतुरबाई विद्यालयाच्या मुख्याध्यापिका राखी देशमाने, इंग्लिश मिडीयमच्या, पी.एस. इंग्लिश मीडियम मुख्याध्यापिका स्वाती कांबळे यांची उपस्थिती होती. आरंभी विद्येची आराध्य देवता सरस्वती माता, प्रथम शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व संस्थेच्या संस्थापिका पद्मश्री पंडिता सुमतिबाई शहा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रशालेच्या संगीत शिक्षिका सोनाली उंडे, पल्लवी खांडवे, तबलावादक शिक्षक वृषभ सोनटक्के व इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनींनी सुमधुर  स्वागतगीताद्वारे मान्यवरांचे स्वागत केले. सोनल आळंद यांनी कार्यक्रमासाठी लाभलेल्या अष्टपैलू प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला.प्रशालेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ, बुके व संस्थेच्या संस्थापिका पंडिता राजुलमती माताजींचे  चरित्र जीवनज्योत या पुस्तकाची प्रत देऊन सत्कार करण्यात आला. प्रशालेचे कलाशिक्षक प्रवीण कंदले यांनी आपल्या कुंचल्यातून साकारलेले श्री व सौ. सुहासिनी यतीन शहा यांचे चित्र डॉ.सुहासिनी शहा यांना भेट दिले. मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे यांनी आपल्या प्रास्ताविकाद्वारे आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा व  पद्मश्री पंडिता सुमतिभून , राजुलमती माताजी, रतनचंदजी शहा, सुभाषचंद्र शहा, प्रथम मुख्याध्यापिका विद्युल्लता शहा, हर्षवर्धनजी शहा यांच्या आठवणींना उजाळा देऊन संस्थेच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा दिला. स्पर्धेच्या युगात मराठी शाळा टिकविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले व प्रिसिजन फाउंडेशन च्या वतीने मराठी शाळांसाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची त्यांनी स्तुती केली.

     यावेळी मागील सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी ते दहावीतील गुणानुक्रमे प्रथम, व द्वितीय क्रमांक संपादन करून  स्वतःचे व प्रशालेचे नावलौकिक वाढविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा  व राष्ट्रीय, राज्य, जिल्हा पातळीवरील विविध क्रीडा स्पर्धेत शाळेचे प्रतिनिधित्व करून यश

 संपादन करणारे खेळाडू अशा 56 विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. प्रशालेच्या  मागील वर्षीच्या कामगिरीचा आलेख म्हणजेच वार्षिक अहवालाचे वाचन व उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित व पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ यांनी केले.इयत्ता सातवी क तील विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षिका सोनाली उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.सुहासिनी शहा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पहावीत, ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवावी असा सल्ला यावेळी विद्यार्थ्यांना दिला. पालकांनी आपल्या अपेक्षांचे ओझे आपल्या पाल्यावर लादू नयेत अशी अपेक्षाही त्यांनी पालकांकडून व्यक्त केली. कार्यक्रमाचे नेटके नियोजन पाहून त्यांनी मुक्तकंठाने स्तुती केली व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धा घेण्याचा सल्लाही दिला. बदल ही सातत्याने होणारी प्रक्रिया असल्याने प्रत्येकाने त्याला सामोरे गेले पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. प्रिसिजन फाउंडेशनचे समन्वयक देशपांडे यांनीही आपल्या मनोगताद्वारे यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व इतर विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशालेतील इयत्ता पाचवी अ, सहावी अ व इयत्ता सातवी क या वर्गांना आदर्श वर्ग म्हणून तर 100% उपस्थितीबद्दल इयत्ता दहावी ब या वर्गाचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. इयत्ता नववी ड तील विद्यार्थिनी गायत्री निकते,नववी अ तील  श्रुतिका सुरवसे, सातवी क तील प्रतीक काकडे व सहावी अ तील जान्हवी सिद्धगणेश दहावी क तील श्रुती कदम,सहावी ब तील ज्ञानेश्वरी शिंदे, आठवी ब तील भक्ती लामकाने,सातवी ब तील ऋतुजा हिप्परकर हे गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी ठरले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवी खोत व अनंत बळळे यांनी तर आभार राजश्री आगरखेड यांनी मानले. बक्षिसांचे यादी वाचन प्रीती वऱ्हाडे व कविता उपाध्ये यांनी केले.कार्यक्रम स्थळी केतकी सोनटक्के व सरस्वती शेटे यांनी रेखाटलेली रांगोळी सर्वांचे आकर्षण ठरली. प्रशालेतील तंत्रस्नेही शिक्षक अभिजीत पाटील व वृषभ सोनटक्के यांनी केलेल्या पीपीटीचेही मान्यवरांनी कौतुक केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  सांस्कृतिक विभाग, अनुप कस्तुरे , सुहास छंचुरे, अभिनंदन उपाध्ये प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आर. एस. पी. स्काऊट गाईड विद्यार्थी विद्यार्थिनीनी परिश्रम घेतले.

Post Views: 90
Previous Post

एल.बी.पी.एम. महाविद्यालयातील खेळाडूंची विद्यापीठ संघात निवड

Next Post

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाकडून बेबी किट चे वाटप

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाकडून बेबी किट चे वाटप

ताज्या बातम्या

हिंगोली जिल्ह्यात हेल्मेट बंधनकारक – डॉ. नीलाभ रोहन

April 21, 2026

राज्य कर्मचारी शिक्षक बेमुदत संपावर

April 21, 2026

सोयगाव शहरात पहिल्या बाल उद्यानाचे उद्घाटन संपन्न

April 21, 2026

पतीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून ; चुलतीनेच केला पुतण्याचा खून ..

April 21, 2026

पूर्णा नदी पात्रातून अवैध्य वाळू उपसा ; प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप

April 21, 2026

गंधोदक हे केवळ जल नसून सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत

April 21, 2026

वाफळे येथे २७ एप्रिलला जिल्हा किशोर- किशोरी खो-खो स्पर्धा ..

April 21, 2026

मंठा तालुक्यात अनधिकृत रित्या अवैध्य वाळू उपसा

April 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0822039

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697