माढा : येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त यशवंत फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने शहरातील जि.प.मुलींची शाळा नं. १, नं.२ व उर्दू या शाळेतील विद्यार्थ्यांना फाउंडेशनचे अध्यक्ष तथा शिवसेना शहर प्रमुख देविदास खरात यांच्या मार्गदर्शनाखाली वह्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शिवसेनेचे संतोष जुगदार प्रमुख पाहुणे म्हणून माढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रोहित शिंदे, उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक सुरेश माळी यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापकांना विद्यार्थी संख्येप्रमाणे मान्यवरांनी वह्यांचे वाटप केले.६०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना वह्या देण्यात आल्या. या गोष्टीचे औचित साधून डॉ यु एफ जानराव यांनी मनोगत व्यक्त करुन शाळेला महापुरुषांचे शंभर पुस्तके दिली. सहा निरीक्षक रोहित शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना या या कार्यक्रमाची प्रशंसा करत पुरुषांच्या जयंती या पद्धतीने साजरे होणे म्हणजे आपण महापुरुषांचे विचार अंगीकृत करत आहोत. वह्या व पुस्तकाचे वाटप करून आपण समाजापुढे एक चांगला आदर्श घालून देत आहोत. ही गोष्ट महापुरुषांच्या विचाराला पूरक ठरणारी आहे.
याप्रसंगी सहा. पोलीस निरीक्षक रोहित शिंदे, यशवंत फाउंडेशनचे अध्यक्ष देवीदास खरात, डॉ.यू.एफ.जानराव, संतोष जुगदार, दिनेश जगदाळे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश मोरे, बापू राऊत, दत्तात्रय राऊत, शिवाजी माने,किरण पवार, रवि सरवदे, विकास पवार, अमोल खरात, अनिकेत चवरे, पत्रकार मदन चवरे, शेखर म्हेत्रे, बिरुदेव वाघमोडे,अक्षय विद्यागज, हनुमंत माने, समाधान सुतार,शरद भांगे, कुंदन पवार, मोतीलाल सुतार आदी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सुरेश माळी, सहशिक्षक चारुदत्त आष्टेकर, सोमनाथ शिंदे, प्रवीण भांगे आदींनी परिश्रम घेतले आभार अमोल खरात यांनी मानले.

























