सोलापूर – जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक एक कडून सभासदांसाठी राबविण्यात येणाऱ्या विमा योजनेअंतर्गत मयत कनिष्ठ सहाय्यक अनिल विठोबा धुळम यांच्या पत्नी अनुराधा धुळम यांना दोन लाख रुपायाचा धनादेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी व्हाईस चेअरमन श्रीधर कलशेट्टी, संचालक डॉ. एस पी माने, तज्ञ संचालक श्रीशैल देशमुख, चेअरमन श्वेता राऊत, संचालक सुरेश कुंभार, एस. आर. तांबोळी, व्ही. बी. पाटील. व्ही एम घेरडे, जी. एम. मारडकर, के. जी लालबोन्द्रे, व्ही. के शिंदे, विशाल घोगरे, चेतन वाघमारे, शिवाजी राठोड, तजमूल मुतवल्ली, एम. एस. शिंदे, रोहित घुले, शिवानंद म्हमाणे, डॉ. पी. बी नवले आदी उपस्थित होते.

















