सोलापूर – कार्तिकी यात्रेदरम्यान चंद्रभागा नदीपात्रात अंघोळ करत असताना बुडणाऱ्या दोन पुरुष भाविकांचा जीव आज सकाळी आपत्ती व्यवस्थापन महिला बचाव पथकाच्या सतर्कतेमुळे वाचवण्यात यश आले.
बुडणाऱ्या भाविकांची नावे पुढीलप्रमाणे:
1. शुभम कोपरशुराम बसवंत अड्डासुरे
2. रामकृष्ण सिद्धप्पा कुराडे, राहणार कर्नाटक
या दोघांना नदीपात्रातून सुरक्षित बाहेर काढण्यात आपदा सखी उर्मिला पवार, अरुणा राठोड, दुर्गादेवी बनसोडे, शुभांगी गवते, रेखा राठोड यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांना गुरुनाथ कोरे आणि माऊली अंकुशराव यांचेही मोलाचे सहाय्य लाभले.
या तात्काळ आणि समन्वयपूर्ण कृतीमुळे संभाव्य दुर्घटना टळली असून, भाविकांच्या जीवितास मोठा दिलासा मिळाला आहे. कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन पथकाची ही तत्परता आणि सेवा कौतुकास पात्र ठरली आहे. संपूर्ण यात्रा कालावधीत आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाने एकूण 13 भाविकांचा जीव नदीपात्रात बुडत असताना वाचवलेला आहे.























