सोलापूर – रमजान ईदच्या पवित्र सणाच्या प्रसंगी सामाजिक सलोखा आणि बंधुभाव वाढवण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने होटगी रोडवरील ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देऊन रमजान ईद सणाच्या ‘ईद मुबारक’ म्हणत शुभेच्छा देण्यात आल्या.
गुलाब हे प्रेमाचे आणि आदराचे प्रतीक मानले जाते त्यामुळे रमजान ईद सणाच्या निमित्ताने सामाजिक सलोखा निर्माण होऊन समुदायांमध्ये प्रेम, एकता आणि बंधुभावाची भावना वाढवण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी संभाजी ब्रिगेडचे माजी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले, जिल्हा संघटक तेजस शेळके, सचिन होनमाने, सिद्धू जगताप, दिलीप भोसले, संतोष सुरवसे आदी उपस्थित होते.





















