सुहास राठोड मित्र मंडळाच्या वतीने शालेय साहित्य व छत्रीचे वाटप
मंठा प्रतिनिधी : मंठा तालुक्यातील खोराड सांवगी सर्कल मधील उमरखेडा येथील सुहास राठोड मित्र मंडळाच्यावतिने सुहास राठोड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध सामजिक उपक्रम राबविण्यात आले. यात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व छत्रीचे वाटप करण्यात आले.
तालुक्यातील उमरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत पाठ्य पुस्तक व शालेय साहित्याचे वाटप तसेच मुरुमखेडा, ताळतोंडी ,टोकवाडी , खुर्द पांघरी , रामतीर्थ, विरेगव्हाण या शाळेत छत्र्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या सुरवातीस सरस्वती मातेच्या पुजन करून करण्यात आली. स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल सुहास राठोड यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना सुहास राठोड यांनी बोलताना सांगितले की ,
समाजसेवेची भावना मनात घेऊन आपणही समाजाची काही देणे लागतो. या सामाजिक भावनेतून वाढदिवसाच्या निमित्ताने इतरत्र खर्च टाळता विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व छत्रीचे वाटप करण्याचा आनंद व्यक्त केला. तसेच यापुढे देखील सामाजिक उपक्रम राबवण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला.तसेच शाळेचे मुख्याध्यापक व गावातील नागरिकांनी त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना सुहास राठोड यांच्या हस्ते शालेय साहित्य व छत्रीचे वाटप करण्यात आले. यावेळी गावातील नागरिक व मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.