*संख्यावाढीसाठी येरगीत प्रभात फेरी*
#सरपंचाकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप #
देगलूर : देगलूर तालुक्यातील चालुक्य कालीन नगरी येरगी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थीसंख्या वाढीसाठी व शैक्षणिक जनजागृती साठी रॅली काढण्यात आली.
ग्राम पंचायत कार्यालय,बालिका पंचायत राज समिती व जिल्हा परिषद शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने गावात प्रभात फेरी काढण्यात आली.गावातील प्रत्येक गल्ली बोळातून ही प्रभात फेरी काढण्यात आली.या दरम्यान विद्यार्थ्यांनी आपली मुले शाळेत पाठवा अशा प्रकारच्या विविध घोषणा देऊन नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
प्रभात फेरी चे विसर्जन गावातील प्राचीन सरस्वती मंदिर परिसरात झाले. येथे सरस्वतीचे विधिवत पूजन करण्यात आले.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी शालेय गीतांची प्रस्तुती दिली.त्यानंतर सरपंच संतोष पाटील यांच्या हस्ते शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी वही व पेन चे वाटप केले.त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संतोष पाटील यांनी सर्व गावकऱ्यांना आवाहन केले की त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठवावे ,मुलगा आणि मुलगी यात भेदभाव न करता शिक्षणाची समान संधी द्यावी असे ते म्हणाले.
तसेच गावातील शाळेच्या विकासासाठी सदैव तत्पर असल्याचे सांगून शाळेला शक्य ते मदत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी मुख्याध्यापक अशोक देवकत्ते, माजी सरपंच चांदू कांबळे,ग्राम पंचायत सदस्य अशोक वाघमारे, इरवंत कालिंगवार,गजानन भोकसखेडे,हणमंत पाटील,हणमंत दानेवार,मारोती मनरवार,आदी महिला पुरुष उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील सहशिक्षक ईश्वर वाडीकर यांनी केले तर प्रभात फेरी व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालिका पंचायत राज समितीचे महादेव दाणेवार, पुनम सुर्यवंशी, अंजली वाघमारे, करूणा बागेवार, शिवाणी मटपती, अनिता बागेवार, महादेव गादगे, रोहिणी दाणेवार, रूद्राणी चैडके, शिवकांता भुरळे, श्रीदेवी धाकपाडे, सर्व पदाधिकारी आणि शाळेतील सर्व शिक्षकांनी आनद कदम, राहुल ढगे, सिध्देश्वर कुटे, भुमन्ना तलगे, रमाकांत वाघमारे हणमंत थावरे परिश्रम केले.